Uncategorized

उंब्रज पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

मारहाण,जबरी चोरी करणाऱ्या आरोपींना अवघ्या सहा तासात अटक

 

मारहाण,जबरी चोरी करणाऱ्या आरोपींना अवघ्या सहा तासात अटक

(उंब्रज पोलिसांची कारवाई)

उंब्रज पोलीस ठाणे गुन्हा रजि न 276/2025 BNS 309(6) प्रमाणे दाखल गुन्ह्यातील फिर्यादी श्रीकांत गोपु राठोड वय 45 वर्ष व्यवसाय मुकादम रा. वाठार किरोली ता. कोरेगांव जि. सातारा हे दिनांक 10/06/2025 रोजी रात्री 20.00 वा. सुमारास मौजे उंब्रज येथील पाटण तिकाटने बोगदयात आले असता आरोपीत नामे आकाश संतोष आटोळे व अमोल रमेश चव्हाण दोघे रा. लक्ष्मीनगर उंब्रज ता. कराड यांनी फिर्यादी यांचेकडे लिफ्ट मागुन त्यांचे मोटार सायकलवर बसुन वरद विनायक मंगल कार्यालय पुढे नदीकाठाला अंधारात मोटार सायकल थांबविण्यास सांगुन फिर्यादी यांना मारहान करून जिवे मारण्याची धमकी देवुन जबरदस्तीने त्यांच्या खिशातील मोबाईल व 20,000/- रोख रक्कम असे एकुण 34,000/-रुपये जबरी चोरी करुन काढुन घेतले.बाबतची तक्रार पोलिस ठाण्यास प्राप्त होताच घटनेचे गांभीर्य ओळखून उंब्रज पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे यांनी लागलीच तपास पथक बनवून आरोपींना अवघ्या सहा तासात ताब्यात घेऊन गुन्ह्यांत चोरीला गेलेला मोबाईल व रोख रक्कम आरोपीत यांचे कडून जप्त केली आहे.
सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक श्री. तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी कराड श्री अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली API रविंद्र भोरे, PSI गणेश भोसले, पोलीस हवालदार संजय धुमाळ, युवराज पवार, दिनेश भोसले तसेच पोलीस कॉन्स्टेबल निलेश पवार, मयूर थोरात, राजू कोळी, मधुकर मांडवे, प्रशांत पवार यांनी केली आरोप अटक करण्यास पुसेगाव पोलीस ठाण्याची मदत झाली गुन्ह्याचा पुढील तपास PSI भोसले करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button