कृष्णेचा आदर्श घ्या..अन्यथा आंदोलनास सामोरे जा:सचिन नलवडे

कृष्णेचा आदर्श घ्या..अन्यथा आंदोलनास सामोरे जा:
सचिन नलवडे
रघुनाथ थोरात
राज्यातील बहुतांश साखर कारखान्यांनी पूर्ण एफआरपी न दिल्याने ऊस नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिन नलवडे यांनी साखर आयुक्तांना पत्र व्यवहार करून व पत्रकाद्वारे आठ दिवसात एफआरपी न दिल्यास कारखान्यावरती आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.
कराड तालुक्यातील कृष्णा सहकारी साखर कारखाना व जयवंत शुगर या साखर कारखान्यांनी आपली एफआरपी पूर्ण केली.परंतु, जिल्ह्यातील इतर बऱ्याच कारखान्यांनी अद्यापही शेतकऱ्यांना पूर्ण एफआरपी अदा केली नाही.त्यामुळे रयत क्रांती संघटना आक्रमक झाली असून सचिन नलवडे यांनी येत्या सोमवार पर्यंत उर्वरित साखर कारखान्यांनी आपली पूर्ण एफआरपी शेतकऱ्यांना अदा केली नाही तर मंगळवारपासून संबंधित साखर कारखान्यांवरती तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
कृष्णा सहकारी साखर कारखान्याने व जयवंत शुगर या साखर कारखान्याने पूर्ण एफआरपी दिल्याबद्दल रयत क्रांती संघटनेच्या वतीने या कारखान्याचे चेअरमन माननीय सुरेश बाबा भोसले व विनायक भोसले यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.यावेळी सचिन नलवडे सदस्य ऊस नियंत्रण मंडळ महाराष्ट्र शासन,
शिवाजी पाटील जिल्हाध्यक्ष रयत क्रांती संघटना, विशाल पुस्तके कराड उत्तर अध्यक्ष, अशोक लोहार कराड दक्षिण
अध्यक्ष,अनिकेत ठोंबरे,नितीन शिर्के,संतोष कणसे,सचिन नांगरे, प्रसाद धोकटे,शंकर आतकारे उपस्थित होते.
गेले तीन चार वर्षे जिल्ह्यातील ऊसदराची कोंडी फोडण्याचे व उच्चाकी दर देण्याचे काम कृष्णा सहकारी साखर कारखाना करत आहे.त्यामुळे ज्या पद्धतीने संघटना ऊसदरासाठी कारखान्याच्या विरोधात आंदोलन करते त्याचप्रमाणे जो कारखाना ऊस दर जाहीर करतो त्यांचा सत्कार करण्याचे काम ही संघटना करते.
ज्यांनी एफ आर पी दिली नाही त्यांनी चार दिवसात द्यावी अन्यथा रयत क्रांती त्यांच्या कारखान्यावर आंदोलन करणार आहे.
सचिन नलवडे
पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष




