महाराष्ट्र ग्रामीण

श्री क्षेत्र देवगड –पंढरपुर बस एकादशीच्या दिवशी दि.२२ जुन २५ रोजी सुरू होणार — अनिल ताके

नेवासा ( प्रतिनिधी ):- श्री क्षेत्र देवगड –पंढरपूर ही गाडी चालू करून बस स्थानक व आगारातील इतर मागण्यांसाठी नेवासा तालुका प्रवासी संघटनेचे वतीने विभाग नियंत्रकांना बस स्थानक बंद करण्याचा इशारा देण्यात आला होता.मात्र अंदोलनापूर्वीच अहिल्यानगर विभाग नियंत्रक श्री जगताप व विभागीय वाहतूक अधीक्षक सी. एस. चोधरी यांनी निवेदनाची दखल घेऊन विभाग नियंत्रक कार्यलयाचे श्री शहानवाज मणियार यांना नेवासा येथे अनिल ताके यांच्याशी चर्चा करण्यासाठी पाठवले त्यावेळी झालेल्या चर्चेत संघटनेने केलेल्या सर्व मागण्याची विभागीय स्तरावर त्वरित दखल घेण्यात येऊन सर्व मागण्या मार्गी लावण्याचे लेखी आश्वासन विभाग नियंत्रक कार्यलयाचे श्री मणियार व आगार व्यस्थापक श्री प्रशांत होते यांनी श्री ताके यांना दिले असल्याने प्रवासी संघटनेने आयोजित केलेले सोमवार दि१६ .जुन २५ रोजीचे नेवासा बस स्थानक बंद आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आल्याचे सांगुन श्री क्षेत्र देवगड– पंढरपुर ही बस रविवार २२ जुन २५ रोजी भागवत एकादशी चे मुहूर्तावर देवगड वरून चालू करण्यात येणार असल्याची माहिती नेवासा तालुका प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अनिल पा. ताके यांनी दिली.


राज्य परिवहन महामंडळाच्या नेवासा आगाराला नवीन किमान १० बसेस देण्यात याव्यात,श्री क्षेत्र देवगड -पंढरपूर ही बस पुन्हा चालू करण्यात यावी,नेवासा बस स्थानकात सुरक्षा रक्षक नेमण्यात यावा इत्यादी प्रमुख मागण्यांसाठी नेवासा तालुका प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अनिल पा.ताके महामंडलचे व्यवस्थपकीय संचालक माधवराव कुसेकर यांच्य सह अहिल्यानगर विभाग नियंत्रक श्री जगताप यांना निवेदन देऊन नेवासा बस स्थानक बंद आंदोलनाचा इशारा दिला होता,परंतु आंदोन्नपूर्वीच विभाग नियंत्रक श्री जगताप व विभागीय वाहतूक अधीक्षक श्री चौधरी यांनी श्री ताके यांच्या निवेदनाची दखल घेऊन निवेदनात केलेल्या सर्व मागण्या मान्य केल्याचे लेखी आश्वासन विभाग नियंत्रक कार्यालयाचे शहानवाज मणियार व आगार व्यवस्थापक प्रशांत होले यांनी श्री ताके यांना दिले असल्याने संघटनेचे वतीने सोमवार दि १६ जुन २५ रोजी बस स्थानक बंद आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आल्याचे सांगून संगटनेच्या प्रमुख मागण्या प्रमाणे श्री क्षेत्र देवगड –पंढरपूर ही गाडी प्रायोगिक तत्वावर दि २२ जून २५ रोजी भागवत एकादशी च्या मूहुर्तावर दर महिन्याच्या एकादशीला देवगड वरून सुरू करण्यात येणार आहे,त्याचप्रमाणे नेवासा आगाराला अजून नवीन ५ बस गाड्यांचा प्रस्ताव पाठवण्यात आला असून नवीन गाड्या देखील लवकरच आगाराला मिळतील,असेही अनिल ताके यांनी सांगितले.
नेवासा आगारात विभागाचे शहानवाज मणियार यांचेशी झालेल्या बैठकीत सामाजिक कार्यकर्ते राहुल देहाडराय,आगर व्यस्थपक प्रशांत होले, नेवासा आगराचे वरिष्ठ लेखनिक वासुदेव आव्हाड,राकेश सोनवणे,बबनराव ओनावले, प्रसाद परदेशी आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button