Uncategorized

कराडमधून दुचाकीची चोरी

कराडमधून दुचाकीची चोरी

रघुनाथ थोरात

मलकापूर,ता.कराड येथील रहिवासी विजय भगवान जाधव यांची दुचाकी राहत्या घरासमोरून चोरीला गेल्याची घटना घडल्यामुळे एकच खळबळ उडाली असून कराड परिसरात दुचाकी चोरणारी टोळी सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. याबाबत विजय भगवान जाधव यांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, त्यांच्या मालकीची होंडा कंपनीची यूनिकॉर्न MH-50 K 3992 ही दुचाकी अथर्व प्लाझा,नस्टे किराणा दुकानासमोर,मलकापूर,कराड येथून शनिवार दिनांक 26 जुलै रोजी रात्रीच्या सुमारास चोरीस गेली असून सदर घटनेची नोंद पोलिसांत झाली असून सदर दुचाकी आढळून आल्यास 9975611677 या क्रमांकावर संपर्क साधावा. शोधून देणाऱ्यास योग्य ते बक्षीस दिले जाईल असे आवाहन विजय जाधव यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button