Uncategorized

नाणेगाव(पुनर्वसन) मध्ये पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाची तयारी पूर्ण..

(नागरिकांनी कृत्रिम कुंडातच गणेश मूर्तींचे विसर्जन करावे: ग्रामपंचायतीचे आवाहन)

नाणेगाव(पुनर्वसन) मध्ये पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाची तयारी पूर्ण..

(नागरिकांनी कृत्रिम कुंडातच गणेश मूर्तींचे विसर्जन करावे: ग्रामपंचायतीचे आवाहन)

रघुनाथ थोरात

नाणेगाव(पुनर्वसन),ता.कराड येथील ग्रामपंचायत प्रशासनाने पर्यावरण पूरक गणेश विसर्जनाची तयारी पूर्ण केली असून तयार केलेल्या कृत्रिम कुंडातच गणेश मूर्तींचे विसर्जन करावे असे आवाहन ग्रामपंचायतीने केले आहे. दिवसेंदिवस नद्या,विहिरी, तलाव आदींमध्ये होणारे जलप्रदूषण लक्षात घेता शासनाने पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना केले होते. त्या संदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या होत्या. त्यानुसार कराड तालुक्यातील नाणेगाव(पुनर्वसन) ग्रामपंचायतीने शासनाच्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत पर्यावरण पूरक गणेश विसर्जनाची तयारी पूर्ण केली आहे. येथील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या टाकीजवळ एक कृत्रिम जलकुंड तयार करण्यात आले असून निर्माल्य साठवणुकीची वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिकांनी त्या कुंडामध्येच गणेश मूर्तीचे विसर्जन करून निर्माल्य साठवणूक स्थळी निर्माल्य टाकायचे आहे.तसेच परिसरात जनजागृतीचे फलकही लावण्यात आले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button