” अक्षर अक्षर शिकून आम्हा शब्दांचा अर्थ सांगितला कधी प्रेमाने तर कधी रागवून जीवनाचा अर्थ दाखविला”

नेवासा ( प्रतिनिधी )
” अक्षर अक्षर शिकून आम्हा शब्दांचा अर्थ सांगितला कधी प्रेमाने तर कधी रागवून जीवनाचा अर्थ दाखविला”.सन 1990 91 बॅचच्या ३५ वर्षांनी विद्यार्थ्यांचा “स्नेह मेळावा मैत्रीचा” उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आदरणीय मकासरे सर यांनी भूषविले तर आदरणीय व्ही.जे. जाधव सर हे प्रमुख पाहुणे होते यावेळी श्री योसेफ मकासरे सर,
श्री व्ही.जी जाधव सर,श्री. व्ही. जे.पवार सर
श्री.बी. आर.माने सर, श्री वाय. एम. गायकवाड सर, श्रीम. पी.पी साठे मॅडम, श्री.यु. डी. बडे सर, श्री. एस. एम तिजोरे सर,श्रीम. विजया मगर मॅडम,श्री के. एस. पवार सर, श्रीम. यु. पी. गायकवाड मॅडम,स्मिता होळकर मॅडम, मनीषा गायकवाड मॅडम इ. शिक्षक उपस्थित होते.
तसेच लिपिक म्हणून श्री.व्ही. एन. पातारे,श्री. अशोक गायकवाड सर तसेच . श्री. सोनवणे मामा, श्री. लुकस तिजोरे, शशी वाघमारे, श्री मोहन जाधव सर, श्री. मकासरे इतर कर्मचारी ही उपस्थित होते या सर्वांचे बॅच तर्फे ट्रॉफी,शॉल गुलाबपुष्प व गिफ्ट देऊन आदरपूर्वक सन्मान करण्यात आला आपल्या शिक्षकांबद्दल सुमन तिजोरे, संतोष तेलतुंबडे अण्णा शेळके विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.शिक्षकांचे व आपल्या जीवनातील स्थान अग्रगण्य असते परंतु त्यांचे ऋण आपण कधीच फेडू शकत नाही. स्नेह मेळावा मैत्रीचा या कार्यक्रमामधून शिक्षकांबद्दल अनेकांनी कृत- कृतार्थ उद्गार काढले. शिक्षक हा जीवन रुपी वाट दाखवणारा मार्गदर्शक असतो.ती वाट न सोडता मार्गक्रमण केले तर जीवन नक्कीच यशस्वी होते. आदरणीय योसेफ मकासरे सर यांनी गौरव उद्गार काढले आदरणीय व्ही.जे. जाधव सर यांनी आपले मनोगत मधुन ज्यामध्ये विद्यार्थ्यांमधील सकारात्मकता, ज्ञानाची भूक आणि भविष्यातील प्रगती पाहून शिक्षकाला आनंद होतो, तसेच पालकांचे पाठिंबा आणि संवादाचे महत्त्व अधोरेखित केले जाते. शिक्षकाला आपल्या विद्यार्थ्यांमध्ये भविष्याची आशा दिसते, कारण ते ज्ञानी होऊन समाजात चांगले स्थान मिळवतात. मार्गदर्शन केले माजी विद्यार्थी मध्ये निधन झालेल्या विद्यार्थ्यांना दोन मिनिट उभे राहून श्रद्धांजली वाहण्यात आली.बॅच चे 72 विद्यार्थ्यांनी रूरल हाईस्कूल वडाळा मिशन या आपल्या शाळेला 6 व्हाईट बोर्ड व पाण्याच्या टाकीचे स्टॅन्ड देऊन. शाळेच्या परिसरमध्ये वृक्षारोपण केले. सर्व विद्यार्थी शिक्षकांमध्ये स्नेहभोजनाचा कार्यक्रम पार पडला. “स्नेह मेळावा मैत्रीचा” हा ग्रुप कायम राहून सामाजिक कार्यात अग्रेसर राहिलं. अशी सर्व विद्यार्थ्यांची इच्छा आहे.सदरकार्यक्रमाचे नियोजन सुभाष कांबळे, अनिल तेलंगे, सुनील हिवाळे, विनायक बडे, अनिल कर्डिले, सुनील पतंगे, अरुण मोटे पुष्पा जगताप, राजू झावरे धनंजय पतंगे कुंदा तेलंगे, उज्वला ओहळ, तसेच जिल्हा आदर्श शिक्षिका सुमन तिजोरे मॅडम यांनी केले.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम. तिजोरे मॅडम व सुभाष कांबळे यांनी सर्वांचे आभार मानले कार्यक्रमाचे सांगता वंदे मातरम या गीताने झाली.


