Uncategorized

शिवाजीनगरच्या सरपंच सौ सुरेखा पवार यांनी जपली सामाजिक बांधिलकी 

(विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे केले वाटप)

शिवाजीनगरच्या सरपंच सौ सुरेखा पवार यांनी जपली सामाजिक बांधिलकी 
(विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे केले वाटप)
रघुनाथ थोरात
शिवाजीनगर,ता‌.कराड गावच्या सरपंच सौ सुरेखा सचिन पवार तसेच त्यांचे पती सामाजिक कार्यकर्ते श्री सचिन उत्तम पवार यांनी सामाजिक बांधिलकी जपत येथील अंगणवाडीच्या तसेच जिल्हा परिषद शाळेच्या पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना वर्षभर पुरेल एवढ्या वह्या,पुस्तके,पेन आदी शैक्षणिक साहित्याचे वाटप नुकतेच केले. पवार दाम्पत्य परिसरामध्ये सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे दाम्पत्य आहे.आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो  या व्यापक विचारातून,उदात्त भावनेतून शिक्षणाचे महत्त्व ओळखून पवार दांपत्याने शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केल्याचे यावेळी पवार दांपत्याने सांगितले. या सामाजिक बांधिलकीचे कौतुक परिसरातून होत आहे.यावेळी मुख्याध्यापिका मोहिते मॅडम, गायकवाड मॅडम,अंगणवाडी सेविका दिपाली पवार,ग्रा प सदस्य विक्रम साळुंखे, समाधान बोरगे, शाळा व्यवस्थापनचे अध्यक्ष अभिजीत साळुंखे, उपाध्यक्ष सोमार्डे मॅडम, तंटामुक्तीचे अध्यक्ष सुनील पवार, समाजिक कार्यकर्ते सचिन पवार, समाधान पवार,संदीप पवार, दिनकर भोंडगे, राजकुमार सुळे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button