Uncategorized

उंब्रज येथील रस्त्याला स्वर्गीय द श्री जाधव आबा नाव

(परवडकारांच्या कार्याचा उचित सन्मान)

उंब्रज येथील रस्त्याला स्वर्गीय द श्री जाधव आबा नाव
(परवडकारांच्या कार्याचा उचित सन्मान)

रघुनाथ थोरात 

उंब्रज,ता.कराड येथील गणपती पेठेतील रस्त्याला स्वर्गीय द.श्री जाधव आबा असे नामकरण करण्यात आले असून नामकरणाचा शुभारंभ गणपती पेठ येथील प्रमुख ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आला. उंब्रज येथे स्वर्गीय द. श्री जाधव यांनी सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात भरीव योगदान दिले असून त्यांच्या स्मरणार्थ या रस्त्याला त्यांचे नाव देण्यात आले आहे.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रकाश मुसळे,ॲड.रोहित जाधव, पराग देशपांडे,जनार्दन नलवडे, महादेव कुंभार,किशोर कुंभार, श्रीमती विजया जाधव,सौ. कुलकर्णी,सौ कुष्टे तसेच महिला ग्रामस्थ उपस्थित होते.उंब्रजच्या पश्चिमेस असणाऱ्या गणपती पेठ येथे नागरीवस्ती असून या पेठेलाच्या रस्त्याला स्वर्गीय द. श्री जाधव आबा असे नाव देण्यात आले आहे.परवडकार द. श्री यांचे उंब्रजच्या विकासात भरीव योगदान राहिले असून रयत शिक्षण संस्थेचे जनरल बाॅडी सदस्य म्हणून त्यांनी काम केले. तसेच उंब्रजच्या त्रिवेणी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष व प्रमुख आयोजक म्हणून त्याची महत्त्वाची भूमिका होती.त्यांच्या स्मरणार्थ गणपती पेठ रस्त्याला त्यांचे नाव दिल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button