Uncategorized

कळंत्रेवाडीत ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या सायकलची चोरी

(भविष्यात मोठ्या चोरीच्या शक्यतेची थोरात कुटुंबीयांची प्रतिक्रिया)

कळंत्रेवाडीत ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या सायकलची चोरी

(भविष्यात मोठ्या चोरीच्या शक्यतेची थोरात कुटुंबीयांची प्रतिक्रिया)

रघुनाथ थोरात 

कळंत्रेवाडी,ता.कराड येथील ग्रामपंचायत कर्मचारी श्री अनिल वसंत थोरात यांच्या जनावरांच्या गोठ्याजवळ लावलेली सायकल काल रात्री चोरीला गेल्याचा प्रकार आज मंगळवार दिनांक अठरा नोव्हेंबर रोजी सकाळी उघडकीस आला. याबाबत ग्रामपंचायत कर्मचारी अनिल थोरात यांनी घटनास्थळावरून दिलेल्या अधिक माहितीनुसार, उत्तरमांड नदीकाठा लगतच्या परिसरात त्यांचा गाईंचा गोठा आहे.ते रोज सकाळी नेहमीप्रमाणे गोठ्याकडे गेले असता गोठ्याच्या बाहेर लावलेली सायकल चोरीस गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. दरम्यान,सदरचा संशयित हा गावातीलच असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले असून सदर चोरीची नोंद उंब्रज पोलिसात झालेली नाही.

आज सायकल गेली… उद्या मोठी चोरी झाली तर…!

आज माझी सायकल गेली आहे. चोराचे धाडस वाढले तर उद्या कदाचित माझ्या घरी मोठी चोरी होऊ शकते.अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली असून अनिल थोरात यांचे कुटुंबीय कमालीचे चिंताग्रस्त आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button