अमोल पाटील यांचा शेकडो समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश

अमोल पाटील यांचा शेकडो समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश
रघुनाथ थोरात
उंब्रज,ता.कराड गावचे सुपूत्र तथा राष्ट्रवादीचे निष्ठावंत कार्यकर्ते, माजी आमदार बाळासाहेब पाटील यांचे निकटवर्तीय समजले जाणारे अमोल पाटील तसेच जिल्हा परिषदेचे इच्छुक नाराज उमेदवार जयसिंह पाटील यांनी शेकडो समर्थकांसह नामदार जयकुमार गोरे तसेच कराड उत्तरचे आमदार मनोज दादा घोरपडे यांच्या उपस्थितीत उंब्रज येथे भाजपमध्ये प्रवेश केला. अमोल पाटील तसेच जयसिंह पाटील हे बऱ्याच दिवसांपासून नाराज असल्याच्या चर्चा उंब्रज जिल्हा परिषद गटात सुरू होत्या. जिल्हा परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस मधून मेडिकल व्यवसायिक जयसिंह पाटील हे इच्छुक होते.परंतु,ऐनवेळी तिकीट नाकारल्याने त्यांचा गट भाजपच्या वाटेवर होता.अखेर शुक्रवार दिनांक ३० जानेवारी रोजी जयकुमार गोरे यांची उंब्रज येथे भव्य प्रचार सभा घेण्यात आली. त्या प्रचार सभेत जाहीरपणे अमोल पाटील, जयसिंह पाटील गटाने भाजपचे कमळ हातात घेत वेगळ्या राजकीय बदलाचे संकेत दिले आहेत.त्यामुळे भाजपच्या गोटात आनंदाचे वातावरण असून उंब्रज जिल्हा परिषद गटामध्ये भाजपचे अधिकृत उमेदवार रणजीत जाधव यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे अमोल पाटील,जयसिंह पाटील यांनी स्पष्ट केले.



