Uncategorized
नाणेगाव (पुनर्वसन) येथील युवकाच्या मोबाईलची चोरी

रघुनाथ थोरात
नाणेगाव(पुनर्वसन), ता.कराड येथील रहिवासी रोहित बाळासो कदम या युवकाचा मोबाईल चोरीस गेल्याची घटना घडली आहे. याबाबत रोहित कदम याने दिलेल्या अधिक माहितीनुसार, गुरुवार दिनांक 13 नोव्हेंबर रोजी खालकरवाडी येथे शेती कामासाठी रोहित कदम हा युवक गेला असता शेतात काम करत असताना पडलेला मोबाईल अज्ञाताने चोरला असल्याची घटना घडली. सदरचा मोबाईल Realme c55 या मॉडेलचा असून त्याची किंमत 14800/-असल्याचे यावेळी रोहित कदम याने सांगितले. वरचेवर होणाऱ्या मोबाईल्सच्या चोऱ्यांमुळे नागरिक हैराण झाले आहेत.




