Uncategorized

शिक्षणाबरोबर संस्काराची ढाल पाठीवर घेतल्याशिवाय सुंदर व्यक्तिमत्व घडू शकत नाही:ऍड भारत मोहिते,कराड

शिक्षणाबरोबर संस्काराची ढाल पाठीवर घेतल्याशिवाय सुंदर व्यक्तिमत्व घडू शकत नाही
(ऍड भारत मोहिते)

रघुनाथ थोरात

शिक्षणाबरोबर संस्काराची ढाल पाठीवर घेतल्याशिवाय सुंदर व्यक्तिमत्व घडू शकत नाही असे प्रतिपादन प्रसिद्ध वक्ते ऍड भारत मोहिते,कराड यांनी शनिवार दि. 22.11.2025 रोजी जिल्हा परिषद शाळा शिरगाव येथे बोलताना विद्यार्थी आणि पालक यांच्यासमोर केले.
यावेळी मंचावर शिरगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच शत्रुघ्न पाटील व शाळा समितीचे अध्यक्ष राजेंद्र साळुंखे उपस्थित होते. यावेळी ऍड मोहिते म्हणाले, केवळ 90% पेक्षा जास्त मार्क मिळाले म्हणून त्या विद्यार्थ्याला गुणवत्ता च्या यादीमध्ये समाविष्ट करता येणार नाही. प्रत्येक क्षेत्रामध्ये अव्वल स्थान मिळवण्यासाठी गुणवत्ता ही आवश्यक असते.एखादा यशस्वी शेतकरी,यशस्वी उद्योजक, यशस्वी राजकीय व्यक्तिमत्व बनण्यासाठी सुद्धा गुणवत्ता अंगी असावी लागते.विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेमध्ये ज्ञानग्रहण करणे हे त्यांचे आद्य कर्तव्य आहे.याबरोबर आई वडील आणि गुरुजन यांच्या आज्ञांचे सर्वांगीण व्यक्तिमत्व घडवण्यासाठी पालन केले पाहिजे.आपण विज्ञानाच्या जोरावर सर्व क्षेत्रांमध्ये प्रगती केली परंतु संस्काराला तिलांजली दिल्यामुळे अनेक कुटुंबाचा ऱ्हास होऊ लागला आणि त्यातूनच गुन्हेगारी वाम मार्ग याला चालना मिळू लागली. संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रामध्ये संतांनी घालून दिलेल्या संस्कारावर आपण चालणे आज काळाची गरज आहे. जगाला हेवा वाटणाऱ्या भारतीय संस्कृतीचा विसर आपल्याच देशवासीयांना होत असताना दिसून येत आहे ही गोष्ट अतिशय वेदनादायक आणि मानवतेच्या सर्वांगीण विकासाला खिळ बसणारी आहे. अनेक उच्चशिक्षित विद्यार्थी अमली पदार्थांच्या व्यसनाच्या आहारी जाऊन आपले जीवन उध्वस्त करत आहेत. मोबाईलच्या चुकीच्या वापरामुळे अनेक मुलांचे आरोग्य दिवसेंदिवस बिघडत चालले आहे यासाठी पालकांनी वेळीच जागृत होणे गरजेचे आहे. महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलेल्या तेजस्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सात्विक जीवनशैलीचा प्रत्येक विद्यार्थ्यांनी अभ्यास करून आपली जीवन सुंदर बनवावे. प्रस्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका शैलजा पाटील यांनी तर कार्यक्रमाचे नियोजन शाळा समितीचे अध्यक्ष राजेंद्र साळुंखे यांनी केले.यावेळी सर्व शिक्षक स्टाफ,पालक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button