Crime

चालू गाडीत चोर गाडीवर चढतो व चोरांच्या दोन गाड्या गाडीचा पाठलाग करतात …

नक्की वाचा हा चित्त थरारक प्रसंग.

बीड ( प्रतिनिधी )-

🔥🔥 थरारक अनुभव… जीवघेण्या प्रसंगातून बचाव! खबरदारीचे आवाहन! 🔥🔥

मागील चार दिवस आम्ही कुटुंबासह पर्यटनाला गेलो होतो. 19 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी बदामी (कर्नाटक) येथील किल्ला व लेण्या पाहिल्या, दुपारी विजापूरचे गोलघुमट, आणि सायंकाळी तुळजापूर देवीचे दर्शन घेऊन रात्री नऊच्या सुमारास तुळजापूरहून परत प्रवासास सुरुवात केली.

सोलापूर–धुळे महामार्गाने अंबडच्या दिशेने येताना बीड जिल्ह्यातील पारगाव टोलनाका क्रॉस केला. पुढे विघ्नहर्ता हॉटेल येथे ड्रायव्हरच्या चहासाठी थोडा वेळ थांबलो आणि पुन्हा मार्गस्थ झालो. कुंथलगिरी पुढे सोडून आम्ही अंधारात वेगाने जात होतो.

🕚 साधारण रात्री अकराच्या सुमारास आमच्या टेम्पो ट्रॅव्हल्सचा मागचा दरवाजा खडखड आवाजाने वाजल्यासारखा वाटला. मागे बसलेल्या मंडळींनी पाहिले तर अंगावर काटा आणणारा प्रसंग —
👉 चालत्या गाडीवर कुणीतरी मागच्या शिडीवर चढत होता!

त्याच क्षणी दोन मोटरसायकली आमच्या गाडीच्या वेगानेच मागे धावत असल्याचे दिसले. मोटरसायकलवरूनच तो इसम गाडीवर चढल्याचे स्पष्ट झाले. गाडीतल्या सर्वांनी आरडाओरड करून एकमेकांना सावध केले.

याचवेळी माझ्या पत्नीने प्रसंगावधान राखत मोबाइलमध्ये चित्रीकरण सुरू केले. ड्रायव्हरने क्षणाचाही विलंब न करता गाडीला जोरदार वेग दिला.
गाडीतले सर्वजण जागे व सतर्क असल्याचे लक्षात येताच गाडीवर चढलेला इसम परत त्याच्या मोटरसायकलवर उतरून पसार झाला!

📞 लगेच आम्ही बीड पोलीस कंट्रोल रूमशी संपर्क साधला. त्यांनी शांतपणे आमचे लोकेशन विचारले आणि “पाच मिनिटांत मदत पोहोचेल” असे सांगत आम्हाला धीर दिला.

तेव्हा आमची गाडी पाटोद्याच्या उड्डाणपुलावरून पुढे निघाली होती. पोलिसांनी आम्हाला पुढील कन्हैया हॉटेल येथे थांबण्याचा सल्ला दिला.
गाडी थांबताच आम्ही खाली उतरून सर्व तपासले— गाडीवर कोणी नसल्याची खात्री केली. त्या दरम्यान पोलीस कंट्रोल रूमशी आमचा फोन सुरुच होता. आम्ही सुरक्षित असल्याचे त्यांना कळवले आणि त्यांचे आभार मानले.

⚠️ मित्रांनो… हा संपूर्ण प्रसंग अतिशय धक्कादायक होता.
🛣️ सोलापूर–धुळे महामार्ग, विशेषतः पारगाव टोलनाका ते कन्हैया हॉटेल दरम्यान, रात्री प्रवास करताना अतिशय सतर्क राहणे आवश्यक आहे.

अशा घटना कुणावरही येऊ नयेत… कृपया खबरदारी घ्या, सुरक्षित रहा!

✍️ – धनंजय गुळवणे, अंबड

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button