
मंदिराच्या विटा जेसीबीने दाबल्या…!
(आम्ही मात्र पाहून न पाहिल्यासारखे केल्या)
रघुनाथ थोरात
कळंत्रेवाडी,ता.कराड गावच्या हद्दीत पाटण पंढरपूर राज्य मार्गाच्या विस्तारणीकरणाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे.सदरचे काम करताना पीडब्ल्यूडीने पाटण पंढरपूर राज्य मार्गालगत असलेल्या गणेश मंदिरासमोर रचलेल्या विटांचे नुकसान केल्याचा प्रकार समोर आला आहे. सदर ठिकाणी कोणतीही तमा न बाळगता जेसीबीने विटांचा ढीग दाबण्यात आल्यामुळे विटांचे नुकसान झाले आहे. पीडब्ल्यूडीने केलेल्या वृक्षतोडीमध्ये काही प्रमाणात विटांचे नुकसान झाल्यानंतर या विटांच्या ढिगाला वाली कोण?या माथाळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. परंतु, संबंधितांनी तरीदेखील हा विटांचा ढीग सुरक्षित ठिकाणी हलवण्या संदर्भात कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यानंतर आज परत पीडब्ल्यूडीने सदर विटांचा ढिग जेसीबीद्वारे दाबल्यामुळे विटांचे पुन्हा नुकसान झाले असून देखील गणेश मंदिर कमिटी तसेच ग्रामस्थांनी फक्त बघ्याचीच भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे गणेश मंदिर बांधकामासाठी आणलेल्या या नुकसानग्रस्त विटांना वाली कोण?,सदर नुकसानीस जबाबदार कोण? असे प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाल्यास नवल वाटायला नको.
ढिम्म प्रशासन… असंवेदनशील जनता…!
या दुर्दैवी प्रकारामुळे स्थानिक प्रशासन ढिम्मच असल्याचे सिद्ध झाले असून जनतेचा देखील कमालीचा असंवेदनशीलपणा दिसून येत आहे.ही लोकशाहीसाठी खूप मोठी शोकांतिका आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही…!
.



