महाराष्ट्र ग्रामीण

चरेगाव येथील बाधित शेतकरी आक्रमक

(मोबदल्याची मागणी; आंदोलनाचा इशारा)

चरेगाव येथील बाधित शेतकरी आक्रमक
(मोबदल्याची मागणी; आंदोलनाचा इशारा)

रघुनाथ थोरात

चरेगाव,ता.कराड हद्दीत पाटण पंढरपूर राज्य मार्गाचे चाललेले विस्तारीकरणाचे काम हे मनमानी पद्धतीने सुरू असून सदर कामासाठी विनापरवानगी भूसंपादन करण्यात येत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. बाधित शेतकऱ्यांना कसलाही मोबदला न देता पाटण पंढरपूर राज्य मार्गाच्या विस्तारीकरणाचे काम सुरू असल्याच्या प्रतिक्रिया नागरिक देत आहेत. त्यामुळे बाधित शेतकऱ्यांना योग्य न्याय, मोबदला न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा उबाठा गटाचे कराड उत्तर तालुकाप्रमुख संजय भोसले यांनी दिला आहे. तसेच सदरचे काम हे योग्य ती काळजी न घेता सुरू असल्यामुळे या मार्गावर सतत अपघात होऊन अनेक जण मृत्युमुखी देखील पडले आहेत. रस्त्यावर उडणाऱ्या धुळीमुळे लगतच्या व्यवसायिकांसोबत प्रवाशांना देखील श्वसनाचे त्रास वाढले आहेत. त्यामुळे बाधित शेतकऱ्यांना आधी मोबदला द्यावा त्यानंतरच योग्य ती काळजी घेऊन रस्त्याचे काम सुरू करावे अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडणार असल्याचा इशारा यावेळी चरेगावच्या ग्रामस्थांनी दिला असून आता यावरती प्रशासन काय भूमिका घेणार? हे येणारा काळच सांगेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button