जेष्ठत्वाचा टेंभा मिरवत जिथं तिथं चोच मारणारा कावळा

जेष्ठत्वाचा टेंभा मिरवत जिथं तिथं चोच मारणारा कावळा
रघुनाथ थोरात
कराड तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या एका वाडीवस्तीवरील एका ओसाड माळरानातील जुन्या खोकाड काळ्या कुट्ट काटेरी बाभळीच्या एका फांदीच्या बेचक्यात काटक्या,काथ्यांनी बनवलेल्या घरट्यात राहणारा कावळा ज्येष्ठत्वाचा टेंभा मिरवत जिथं तिथं चोच मारत फिरत असल्याच्या चर्चांना चांगलेच उधाण आले आहे. तसेही ते स्वाभाविकच आहे. स्वतःच्या फायद्यापुरता गोड बोलणारा हा कावळा एखादी गोष्ट अंगलटी येण्याची दिसताच सपशेल शरणागती पत्करतो, मिटवामिटवीची,समेटाची धतरी काव काव करतो अनं दगडाखालचा हात निसटला, आपला कार्यभाग साध्य झाला की उसने आवसान आणत येरे माझ्या मागल्या प्रमाणे आचरण करतो. संधीसाधुपणात माहीर असलेल्या या कावळ्याचे धरसोड वृत्तीचे गमतीदार किस्से सांगावे तेवढे कमीच आहेत. हा काही वेळापूर्वी घेतलेल्या भूमिकेवर दुसऱ्या क्षणी ठाम राहीलच असे नाही. याच्या असल्या दुग्गलपणाचा,तळ्यात मळ्यात भूमिकेचा फटका बऱ्याच जणांना बसल्यामुळे लोक स्वतःचा कपाळमोक्ष करून घेण्यापेक्षा याच्यापासून चार हात लांब राहणेच पसंत करतात.
तूर्तास एवढेच…!



