Uncategorized
उंब्रजच्या मटक्याला..सपोनि रविंद्र भोरे यांचा झटका

उंब्रजच्या मटक्याला..सपोनि रविंद्र भोरे यांचा झटका
उंब्रज/प्रतिनिधी
उंब्रज,ता.कराड येथील एका टपरीत तसेच बाजारपेठेमध्ये अवैधरित्या सुरू असलेल्या मटक्यावर उंब्रज पोलीस स्टेशनचे सपोनि रवींद्र भोरे यांनी धाड टाकून कारवाई केल्यामुळे उंब्रजच्या मटक्याला पोलिसांचा झटका अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. दरम्यान,याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे यांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार,एका टपरीत आरोपी नामे प्रकाश जयसिंग जाधव रा उंब्रज तसेच उंब्रज बाजारपेठेच्या शेजारी राहुल रमेश चव्हाण रा लक्ष्मीनगर उंब्रज हा अवैधरित्या मटका घेताना मिळून आल्याने त्यांचेकडून 2720 रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आलेला असून आरोपींवर वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास उंब्रज पोलीस करीत आहेत.



