उंब्रज पोलिसांच्या तत्परतेमुळे गहाळ मोबाईल सापडला
डॉ प्रशांत बोलके यांनी मानले सपोनि रविंद्र भोरे यांचे आभार

उंब्रज पोलिसांच्या तत्परतेमुळे गहाळ मोबाईल सापडला
रघुनाथ थोरात
उंब्रज,ता. कराड येथील बाजारपेठेतून जवळपास आठ महिन्यांपूर्वी नाणेगावचे रहिवासी डॉ प्रशांत बोलके यांचा मोबाईल गहाळ झाला होता. त्यानंतर बोलके यांनी उंब्रज पोलिसांत त्याबाबतची तक्रार दिली होती. त्यानुसार सातारा सायबर विभाग तसेच उंब्रज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र भोरे, पोलीस कॉन्स्टेबल रविंद्र चव्हाण यांनी योग्य दिशेने तपास केल्यामुळे करून मोबाईल परत मिळवण्यात यश आले आहे. सदर मोबाईल ताब्यात घेतल्यानंतर डॉ प्रशांत बोलके यांना फोन करून पोलिसांनी बोलावून घेतले. योग्य ती पडताळणी केल्यानंतर उंब्रज पोलीस स्टेशनचे सपोनि रविंद्र भोरे,पोलीस कॉन्स्टेबल रविंद्र चव्हाण यांनी डॉ प्रशांत बोलके यांना त्यांचा मोबाईल परत दिला. उंब्रज पोलिसांच्या कार्य तत्परतेचे परिसरातून कौतुक होत आहे.




