नाणेगाव,कळंत्रेवाडीत ‘उमेद’ चा पाच दिवसीय पीआयपी सर्व्हे
(प्रभात फेरी,गृहभेटी,गावचा नकाशा, मशाल फेरीचा समावेश)

नाणेगाव,कळंत्रेवाडीत ‘उमेद’ चा पाच दिवसीय पीआयपी सर्व्हे
(प्रभात फेरी,गृहभेटी,गावचा नकाशा, मशाल फेरीचा समावेश)
रघुनाथ थोरात
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेद अंतर्गत गावातील गरीब,गरजू, वंचित, जोखीम प्रवण कुटुंबांना समृद्ध आत्मसन्मानाने व सुरक्षित जीवन जगता यावे यासाठी त्यांच्या सर्वसमावेशक लोकशाही तत्त्वावर आधारित स्वयंचलित समुदाय संस्थांची निर्मिती करण्यात येत आहे. यामध्ये प्रामुख्याने कुटुंबातील महिलांचे स्वयंसहाय्यता समूह तयार केले आहेत. गरिबांच्या संस्थांमार्फत गरिबांचे हक्क विविध वित्तीय सेवा तसेच त्यांना शाश्वत उपजीविकेच्या संधी प्राप्त होण्याच्या दृष्टीने पोषक वातावरणाची निर्मिती करण्याचे काम उमेद करत आहे. ग्रामीण भागातील दारिद्र्य रेषेखालील प्रत्येक कुटुंबामध्ये कार्यक्षमता आहे व दारिद्र्यातून बाहेर येण्याची तीव्र इच्छा आहे.त्या अनुषंगाने कुटुंबामध्ये उपलब्ध असलेल्या साधनांचे सक्षमीकरण करणे अथवा उपजीविकेच्या साधनांची जोड देणे. गरिबांच्या संस्थान निर्माण करणे व विकासाच्या प्रक्रियेत गरिबांचा समावेश करणे. तसेच पंचायत राज संस्थांमध्ये सहभाग वाढवणे व शासकीय योजना व निर्णय क्षमता वाढवण्यासाठी क्षमता बांधणी करणे.उमेद अभियानाचे काम कराड तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून तालुका व्यवस्थापक निलेश पवार तसेच उंब्रज,पाल विभागाच्या प्रभाग समन्वयक माधवी वनारसे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली अहोरात्रपणे सुरू आहे.परंतु,असे असले तरी बहुतांश कुटुंबांचा अद्यापही समूहांमध्ये समावेश झालेला नाही. म्हणून गरीब, मध्यम गरीब,अति गरीब असलेल्या कुटुंबांचा प्रक्रियेमध्ये समावेश करण्यासाठी व गरिबांची ओळख निर्माण करण्यासाठी मंगळवार दिनांक २८ जुलै २०२५ ते ०१ ऑगस्ट २०२५ पर्यंत उमेद अभियानांतर्गत गावोगावी पाच दिवसीय गरिबांची ओळख (पीआयपी) सर्व्हेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून मौजे नाणेगाव, कळंत्रेवाडी येथील सात्विक ग्राम संघाच्या महिलांनी प्रभाग समन्वयक माधवी वनारसे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभात फेरीचे आयोजन केले होते.दरम्यान,या प्रक्रियेमध्ये गाव स्तरावरील समूहातील सदस्य, ग्राम संघातील सदस्य,विविध समिती सदस्य, शासकीय सेवादाते व प्रेरिका यांच्या साह्याने ग्रामपंचायतीला विश्वासात घेऊन पीएपी सर्वे मध्ये गाव नकाशा, कुटुंब सर्वेक्षण,क्षेत्रभेटी व लोकसहभागातून गरीब कुटुंब ओळखण्याचे विविध तंत्राद्वारे एकूण कुटुंबसंख्या, मध्यम गरीब कुटुंब संख्या, गरीब कुटुंब संख्या, अति गरीब कुटुंब संख्या, स्थलांतरित कुटुंब संख्या, समूहाला जोडलेली कुटुंबं, समूहाला न जोडलेली कुटुंबं, एस इसीसी माहिती मध्ये नाव असलेल्या व समूहाला न जोडलेली कुटुंबं, एसइसीसी च्या माहितीमध्ये नाव नाही.परंतु, गरीब,अति गरीब,मध्यम गरीब असलेली कुटुंबं आदी गोष्टींचा सर्व्हे करण्यात येणार असल्याचे प्रभाग समन्वयक माधवी वनारसे मॅडम यांनी सांगितले. दरम्यान, नाणेगाव येथील ज्योतिर्लिंग मंदिरातून काढण्यात आलेली प्रभात फेरीचा शेवट कळंत्रेवाडीतील अंगणवाडीमध्ये करण्यात आला. यावेळी अंधारवाडीच्या प्रेरिका अस्मिता थोरात यांनी सदर पाच दिवसीय पीआयपी सर्वेचे मुख्य उद्दिष्ट तसेच सखोल माहिती उपस्थित महिलांना दिली. कोयनेश्वर कंपनीच्या पशुखाद्याची माहिती ग्रामसंघाच्या अध्यक्षा ज्योती थोरात यांनी दिली.लिपिका ललिता थोरात यांनी प्रास्ताविक केले.तर आभार प्रेरिका स्नेहा थोरात यांनी मानले. यावेळी ग्राम संघाचे अध्यक्ष,कोषाध्यक्ष,सचिव,सर्व समूहांचे अध्यक्ष,सचिव,सदस्य तसेच महिला मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.


