Uncategorized

काठ्या आपटल्या…बॅटऱ्या नाचवल्या

(कळंत्रेवाडीतील प्रकार,नागरिक भयभीत)

काठ्या आपटल्या…बॅटऱ्या नाचवल्या
(कळंत्रेवाडीतील प्रकार,नागरिक भयभीत)

चरेगाव/प्रतिनिधी

कळंत्रेवाडी,ता.कराड येथील पाटण पंढरपूर राज्य मार्गावर असलेल्या गणेश मंदिरा लगतच्या गल्लीमध्ये मंगळवार दिनांक ५ ऑगस्ट रोजी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास अज्ञातांकडून रस्त्यावर काठ्या आपटत,बॅटरी नाचवत नागरिकांच्या घरांच्या खिडक्यांवर बॅटरीने प्रकाश पाडण्याचा खोडसाळ प्रकार झाल्याची घटना घडल्याची चर्चा नागरिकांमध्ये चांगलीच रंगली आहे. झालेल्या प्रकारामुळे नागरिकांची झोपमोड झाली.परंतु,घराबाहेर नक्की कोण अज्ञात व्यक्ती आहेत? हे पाहण्यासाठी येथील रहिवासी स्नेहा थोरात यांनी धाडस दाखवत दार उघडेपर्यंत अज्ञात गल्लीतून निघून गेले होते. एकूणच या खोडसाळ प्रकारामुळे नागरिक भयभीत असून हा खोडसाळपणा करणारे अज्ञात नक्की कोण?हा प्रश्न नागरिकांना पडला आहे.दरम्यान,गावात रात्रगस्त सुरू करण्यात आली की काय? या शंकेतून नागरिकांनी गावचे पोलीस पाटील जयसिंग येळवे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी गस्त सुरू करण्यात आली नसल्याचे स्पष्ट केले.परिसरात एखादी चोरीची घटना घडली तर खबरदारी म्हणून गावामध्ये रात्रगस्त सुरू करण्यात येते. परंतु,अलीकडे चोरीची घटना घडल्याचे ऐकिवात नसल्याने गस्त घालण्याचा प्रश्नच येत नाही. मग रस्त्यावर काठी आपटत, घरांच्या खिडक्यांवर बॅटरीचा प्रकाश पाडण्याचा खोडसाळपणा करून शांतता भंग करणारे हे अज्ञात खोडसाळ नक्की कोण? हा प्रश्न येथील नागरिकांना सतावत असून नागरिक भितीच्या छायेखाली आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button