Uncategorized

नवनिर्वाचित जि प सदस्या मृणाल पाटील यांचा जगन्नाथ थोरात यांच्याकडून सत्कार

नवनिर्वाचित जि प सदस्या मृणाल पाटील यांचा जगन्नाथ थोरात यांच्याकडून सत्कार

रघुनाथ थोरात

नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मंद्रुळ कोळे गटातून मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांच्या पत्नी प्राची पाटील यांचा पराभव झाला असून शिवसेना शिंदे गटाच्या अवघ्या बावीस वर्षीय मृणाल पाटील यांनी विजय नोंदवला आहे. या लढतीकडे जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. त्या पार्श्वभूमीवर जि प सदस्या मृणाल पाटील यांचे स्नेही कराड तालुक्यातील कळंत्रेवाडी गावचे प्रगतशील शेतकरी,तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष जगन्नाथ थोरात यांनी मृणाल पाटील यांची त्यांच्या कराड येथील गजानन हौसिंग सोसायटीतील निवासस्थानी सदिच्छा भेट घेत सत्कार केला.त्यावेळी त्यांच्यासोबत पत्रकार रघुनाथ थोरात हे देखील उपस्थित होते. जगन्नाथ थोरात हे जि प सदस्या मृणाल पाटील यांचे अत्यंत जवळचे नातलग आहेत. दरम्यान,सत्कारानंतर चहापाणी तसेच अल्पोपहार घेत उपस्थितांनी जि प सदस्या मृणाल पाटील यांना भावी राजकीय वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या.यावेळी महेश पाटील,टेंभू गावचे विश्वास पाटील तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button