कळंत्रेवाडीत साळींदराचा धुमाकूळ
(भुईमूग पिकाचे केले अतोनात नुकसान: नुकसान भरपाई शेतकरी राजेंद्र थोरात यांची मागणी)

कळंत्रेवाडीत साळींदराचा धुमाकूळ
(भुईमूग पिकाचे केले अतोनात नुकसान: नुकसान भरपाई देण्याची शेतकरी राजेंद्र थोरात यांची मागणी)
रघुनाथ थोरात
कळंत्रेवाडी,ता.कराड येथे साळींदराने धुमाकूळ घालत ऊसात आंतरपीक असलेल्या भुईमुगाचे अतोनात नुकसान केल्याचे निदर्शनास आले आहे. श्री राजेंद्र बाजीराव थोरात असे नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे नाव असून त्यांच्या मालकीच्या गट क्रमांक ३४/४ असलेल्या बरड नावाचे ३२ गुंठे क्षेत्र असलेले शेत आहे. त्या शेतामध्ये त्यांनी ऊसाची लागण केली असून त्यामध्ये आंतरपीक म्हणून भुईमूग घेतला आहे. त्यापैकी जवळपास ५ गुंठे क्षेत्रावरील भुईमुगाचे साळींदराने नुकसान केले आहे. त्यामुळे वन,कृषी तसेच महसूल या विभागांनी संयुक्तिक पंचनामा करून मला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे.आधीच अस्मानी संकटाने कोलमडलेला शेतकरी अलीकडील काळात वारंवार वन्य प्राण्यांकडून होणाऱ्या पिकांच्या नुकसानीमुळे पुरता मेटाकुटीस आला आहे. त्यामुळे अशा पीक नुकसानीच्या घटनांमध्ये शासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची नितांत गरज आहे. त्यामुळे आता यावरती वन,कृषी तसेच महसूल विभाग काय भूमिका घेणार?हे येणारा काळच सांगेल.
शासनाने तातडीची नुकसान भरपाई द्यावी
जवळपास ३२ गुंठे क्षेत्रावरील भुईमुगाच्या पिका पैकी ५ गुंठे क्षेत्रावरील भुईमुगाचे साळींदराने अतोनात नुकसान केले असून वन,कृषी तसेच महसूल विभागाने संयुक्तिक पंचनामा करून मला नुकसान भरपाई द्यावी अशी माझी मागणी आहे.
श्री राजेंद्र बाजीराव थोरात (माजी सैनिक-कळंत्रेवाडी)




