Uncategorized

उंब्रजच्या महात्मा गांधी विद्यालयात वन्यजीव सप्ताह साजरा

 

उंब्रजच्या महात्मा गांधी विद्यालयात वन्यजीव सप्ताह साजरा

रघुनाथ थोरात

उंब्रज,ता.कराड येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी विद्यालयात ०१ ऑक्टोबर ते ०७ ऑक्टोबर वन्यजीव सप्ताह निमित्त वनविभागातर्फे मार्गदर्शन सत्र घेण्यात आले.
यनिमित्त मार्गदर्शन करण्यासाठी वनविभागातर्फे उंब्रज (वराडे) बीटचे वनपाल मा. संतोष जाधवर साहेब यांच्यासमवेत त्यांचे सहकारी वनरक्षक श्री. सचिन खंडागळे, वनरक्षक श्री. रमेश जाधवर व RRT टीम कराडचे शंभूराज माने हे देखील उपस्थित होते.
बिबट प्राण्याचा वाढता वावर, त्यांच्यापासून होणारा संभावित धोका, त्यासाठी घ्यावयाची काळजी तसेच पर्यावरण हानी रोखण्यासाठीची उपाययोजना अशा विविध बाबींवर या टीमने अतिशय बहुमोल मार्गदर्शन केले.
यावेळी महात्मा गांधी विद्यालयाचे स्कुल कमिटी सदस्य श्री. राजवैभव जाधव,प्रभारी प्राचार्य श्री. वाघमोडे सर, मा.श्री उमरदंड सर उपस्थित होते. यावेळी स्वागत प्रास्ताविक श्री कुंभार सर यांनी केले. तसेच सौ. पाटील मॅडम यांनी पाहुण्यांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button