Uncategorized

डॉक्टर प्रेरणा देसाई हिचे BHMS च्या द्वितीय वर्षामध्ये घवघवीत यश

(सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव)

डॉक्टर प्रेरणा देसाई हिचे BHMS च्या द्वितीय वर्षामध्ये घवघवीत यश
(सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव)

रघुनाथ थोरात

कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील गारगोटी येथील रहिवासी तथा नूतन होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल सांगली या कॉलेजची द्वितीय वर्षामध्ये शिक्षण घेणारी कु प्रेरणा नामदेवराव देसाई हिने BHMS या होमिओपॅथिक मेडिकल सायन्सच्या द्वितीय वर्षामध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. तिचे वडील नामदेवराव देसाई हे यशस्वी फार्मासिस्ट असून देसाई मेडिकल्सच्या माध्यमातून ते गारगोटी परिसरातील रुग्णांना सेवा देत असून एक यशस्वी मेडिकल व्यवसायिक म्हणून ते भुदरगड तालुक्यात प्रसिद्ध आहेत. तर आई सौ प्रज्ञा देसाई यांनी सुद्धा फार्मसी क्षेत्रातील D pharm पर्यंतचे शिक्षण घेतले असून त्या आपल्या पतींना मेडिकल व्यवसायात मदत करतात. मुळचे गारगोटी पासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या भाटिवडे गावचे असणाऱ्या या देसाई कुटुंबाने मेडिकल क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे.डॉक्टर प्रेरणा देसाई हिचे गारगोटी परिसरातून कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button