Uncategorized

चोरीस गेलेली सोन्याची चैन उंब्रज पोलिसांकडून जप्त

सपोनि रविंद्र भोरे व टीमची उल्लेखनीय कामगिरी

चोरीस गेलेली सोन्याची चैन उंब्रज पोलिसांकडून जप्त

उंब्रज:प्रतिनिधी

एसटी प्रवासादरम्यान एका महिलेची चोरीस गेलेली सोन्याची चैन उंब्रज पोलिसांनी मोठ्या कौशल्याने आरोपींकडून जप्त केलेली आहे. दरम्यान, याबाबतची तक्रार शोभा सुभाष मोरे (वय ५६) रा.मलकापूर ता कराड यांनी उंब्रज पोलिसात दिली होती.याबाबत उंब्रज पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, रविवार दिनांक २५ मे रोजी फिर्यादी शोभा मोरे तसेच त्यांची मुलगी शुभांगी, जावई प्रदीप वसंत जाधव रा कोळेवाडी ता कराड जि सातारा असे सर्वजण कराड एसटी स्टँड येथून गारगोटी- कोल्हापूर-पुणे या बसने प्रवास करीत असताना फिर्यादी यांनी पर्समधील चोर कप्प्यात ठेवलेली आठ ग्रॅम वजनाची ८४,५४०/-रुपये किमतीची सोन्याची चैन ही फिर्यादी सोबत बसमधून इतर प्रवास करणाऱ्या संशयित महिला प्रवासी मंदा सागर सकट (वय-३० वर्ष), आरती हरी चौगुले (वय-२९ वर्ष), बाली बाबासाहेब चौगुले (वय-४०) सर्व रा.निपाणी ता. चिकोडी जि.बेळगाव यांनी मौजे उंब्रज ता कराड गावच्या हद्दीत असलेल्या कराड पुणे जाणाऱ्या हायवे प्रवासी तांब्याच्या ठिकाणी चोरून काढून घेतली. अशा संशयावरून उंब्रज पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याच्या तपासाचे अनुषंगाने वर नमूद संशयित महिला आरोपी यांच्याकडे कौशल्याने विचारपूस करून चोरीस गेलेली चैन जप्त करण्यात आलेली आहे. सदरची कामगिरी उंब्रज पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी रविंद्र भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय ठाणेकर, पीएसआय भोसले, एच सी धुमाळ, पीसी मयूर थोरात, प्रशांत पवार यांनी केली असून गुन्ह्याचा पुढील तपास एच सी दिनेश भोसले हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button