Uncategorized

विनापरवाना तोडलेल्या लाकडाची वाहतुक

(दोघांवर गुन्हा दाखल; वनविभागाची कारवाई)

विनापरवाना तोडलेल्या लाकडाची वाहतुक
(दोघांवर गुन्हा दाखल; वनविभागाची कारवाई)

रघुनाथ थोरात

तांबवे पूल,ता कराड येथे लाकडाची विनापरवाना तोडणी करून वाहतूक केल्याप्रकरणी वनविभागाने कारवाई केली आहे. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वनविभागाच्या वराडे परिमंडळचे वनपाल संतोष जाधवर यांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, बुधवार दिनांक १३ ऑगस्ट रोजी तांबवे पुल, ता.कराड या ठिकाणावरून ट्रक क्रमांक एम एच १२ एच डी ९०५१ या ट्रकमध्ये लाकुड माल विनापरवाना तोड करून वाहतुक करताना आढळून आल्याने वनविभागाने पकडला.
याप्रकरणी विलास आत्माराम भिंगारदेवे रा.मरळी ता.कराड,सरफराज इकबाल शेख रा.पाटण यांचेवर विनापरवाना तोड करून लाकूड माल वाहतुक करणे प्रकरणी भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम ४१(२)ब अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कारवाई सातारा जिल्ह्याचे उपवनसंरक्षक मा.श्री अमोल सातपुते, सहाय्यक वनसंरक्षक सौ जयश्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कराडच्या वनक्षेत्रपाल सौ ललिता पाटील,वराडे मंडळ वनपाल श्री संतोष जाधवर,म्होप्रे वनरक्षक सौ पुजा खंडागळे यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button