महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे अहिल्यानगर विभागीय वाहतुक अधीक्षक सी. एस. चौधरी यांना निवेदन देताना प्रवासी संघाचे अध्यक्ष अनिल ताके समवेत राहुल देहाडराय .

नेवासा – ( प्रतिनिधी )
नेवासा आगाराला नवीन किमान १० बसेस देण्यात येऊन नेवासा आगार व बस स्थानकात विविध सुविधा त्वरित उपलब्ध करून .द्या ,
अन्यथा या मागण्यांसाठी सोमवार दि.१६ जुन २०२५ रोजी नेवासा बस स्थानक बंद चे आंदोलन छेडणार असल्याचा इशारा प्रवासी संघाचे अध्यक्ष अनिल पा ताके यांनी अहिल्यनगर चे विभाग नियंत्रक श्री जगताप व विभागीय वाहतूक अधीक्षक सी. एस. चौधरी यांना समक्ष भेट घेऊन निवेदन देऊन दिला आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या विभाग नियंत्रक याना समक्ष दिलेल्या निवेदनात अनिल ताके यांनी म्हटले आहे की,
नेवासा आगार हे संत ज्ञानेश्वर महाराज यांचे पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या ग्रंथराज ज्ञानेश्वरिचे रचनास्थन असलेले वर्दळीचे ठिकाण आहे.परंतु नेवासा बस स्थानक व नेवासा आगारात असलेल्या नादुरुस्त व जुन्या बस,अपुरी चालक-वाहक संख्या, अनियमितपणा,विविध सुविधांचा अभाव या समस्यांमुळे प्रवासी जनता व चालक –वाहक यांच्या मानसिकतेवर परिणाम होऊन भविष्यात या आगराची प्रवासी संख्या घटण्यावर होणार आहे असेही अनिल ताके. यांनी स्पष्ट केले.
नेवासा तालुक्यातील प्रवासी, भाविक – जनता व चालक – वाहकांच्या भावना लक्षात घेऊन नेवासा आगार व बस स्थानकात पुढीलप्रमाणे सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात अशी ताके यांनी मागणी केली. आहे त्या मागण्या पुढीलप्रमाणे….
१)चालक ७
वाहक ७
कमी आहेत त्यांची तत्काळ नव्याने नेमणूक व्हावी.
२)चालक ७८
वाहक ७४
सध्या उपस्थिती आहे
३)कमीत कमी १० बसेसची गरज आहे.
४) श्री क्षेत्रदेवगड –पंढरपूर ही पूर्वी नियमित चालू असलेली व सध्या बंद असलेली बस नेवासा तालुक्यातून एक टायमिंग परमनंट चालू करणे.
५) नेवासा आगारात स्क्रू चेंज संभाजीनगर शिर्डी 12 बस
परळी त्र्यंबक 4 बस
एकूण 16 बस मेंटनस साठी आगारात येत असल्याने बहुसंख्य प्रवाशी आगारात येतात त्यांच्या टॉयलेट बाथरूम व पिण्याच्या पाण्याची गैरसोय असल्याची तक्रारी प्रवाशां बांधव करत आहे त्यावर परमनंट काम करणे अथवा अधिकृत कॅंटीन साठी परवाना देणे जेणेकरून सर्व प्रवाशी बांधवांची होणारी गेरसोय टळेल.
६) आगारात ज्या प्रकारे वॉचमन नेमणूक आहे त्याचप्रमाणे बस स्टँडवर महिला प्रवाशांच्य सुरक्षित ते साठी वॉचमन नेमणूक करावी .
नेवासा आगार उत्पन्ना च्या बाबता कायम अग्रेसर आहे .
यापूर्वी देखील मी आपणास वरील मागण्यांसाठी वेळोवेळी निवेदन दिलेले आहेत, त्यामुळे यातील सर्व मागण्या त्वरित मान्य करण्यात येऊन नवीन “किमान १० बस नेवासा आगाराला देण्यात याव्यात अन्यथा या मागणीसाठी आम्ही प्रवासी भाविक जनता यांना बरोबर घेऊन सोमवार दि.१६ जुन २०२५ रोजी नेवासा बस स्थानक बंद आंदोलन छेडणार आहोत असा इशाराही अनिल ताके यांनी दिला आहे.
या निवेदनाच्या प्रति खालील मान्यवरांना पाठवण्यात आल्या आहेत .
- प्रति
१)मा. ना .राधाकृष्ण विखे पाटील
पालकमंत्री अहिल्यानगर जिल्हा तथा जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य.
२)मा. ना. प्रतापसिंह सरनाईक
परिवहनमंत्री,महाराष्ट्र राज्य
३)मा. आमदार विठ्ठलराव लंघे पाटील
नेवासा विधानसभा,
४)मा.व्यवस्थपकीय संचालक
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ मुंबई
५)मा. जिल्हाधिकारी साहेब
अहिल्यानगर
६)मा.आगार व्यवस्थापक
नेवासा आगार.
७)मा.तहसीलदार
नेवासा
८)मा.पोलीस निरीक्षक
नेवासा पोलीस स्टेशन



