Uncategorized

….अन्यथा उग्र आंदोलन करणार

(शिवसेनेचा(शिंदे गट) उंब्रज ग्रामपंचायतीस इशारा)

….अन्यथा उग्र आंदोलन करणार
(शिवसेनेचा(शिंदे गट) उंब्रज ग्रामपंचायतीस इशारा)

उंब्रज/प्रतिनिधी

उंब्रज,ता कराड हद्दीतील पाटण पंढरपूर राज्य मार्गालगत पडलेला कचरा तात्काळ हटवावा अन्यथा उग्र आंदोलन करणार असल्याचा इशारा शिवसेनेच्या शिंदे गटाने उंब्रज ग्रामपंचायतीस निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनात पुढे म्हटले आहे की, उंब्रज गावचे हद्दीत पाटण पंढरपूर राज्य मार्गालगत महावितरण कार्यालयाच्या शेजारी तसेच होली कॉन्व्हेंट इंग्लिश मीडियम स्कूललगत बऱ्याच दिवसांपासून मोठ्या प्रमाणात कचरा साठला आहे. त्यामुळे नागरिकांना नाक मुठीत धरून या ठिकाणावरून ये-जा करावी लागत असून उंब्रजकरांचे सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले आहे. सध्या पावसाळा सुरू आहे. त्यामुळे कचरा कुजून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती होऊन डासांमार्फत होणाऱ्या डेंगू, मलेरिया, हिवताप यांसारख्या साथरोगांचा धोका संभवतो. इतकी बिकट परिस्थिती होऊन सुद्धा उंब्रज ग्रामपंचायतीचे त्याकडे साथ दुर्लक्ष झाले आहे. सदर बाब गंभीर स्वरूपाची असून नागरिकांचे सार्वजनिक आरोग्य जपणे हे ग्रामपंचायतीचे प्रथम कर्तव्य आहे.दरम्यान, या कचऱ्यामुळे नागरिकांच्या सार्वजनिक आरोग्यास धोका उत्पन्न झाल्यास अथवा साथ रोगांचा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यास ग्रामपंचायतीस जबाबदार धरून शिवसेना स्टाईलने उग्र आंदोलन केले जाईल व होणाऱ्या परिणामांस ग्रामपंचायत प्रशासन जबाबदार असेल याची नोंद घ्यावी. हा सामाजिक लोकहिताचा प्रश्न असल्यामुळे यावरती तात्काळ कार्यवाही होऊन हा कचरा तात्काळ उचलून नागरिकांचे सार्वजनिक आरोग्य जपावे. दरम्यान, सदर निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी सातारा,मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा, गटविकास अधिकारी पंचायत समिती कराड यांना माहितीसाठी रवाना करण्यात आल्या आहेत. यावेळी सचिन जाधव,अतुल पाटील,विक्रम वाघमारे,रविंद्र हजारे,नितीन थोरात,विठ्ठल जाधव आदि उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button