Uncategorized

उंब्रज पोलिसांची दमदार कामगिरी

(गुन्ह्यात चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त) 

उंब्रज पोलिसांची दमदार कामगिरी
(गुन्ह्यात चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त) 

रघुनाथ थोरात

उंब्रज,या.कराड येथील पोलीस ठाण्यात ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर ७०/२५ या दाखल गुन्ह्यामध्ये अज्ञात आरोपीने फिर्यादी यांचे बंद घरात प्रवेश करून चांदीचे दोन छल्ले तसेच एचपी कंपनीचा लॅपटॉप चोरी करून नेलेबाबत गुन्हा दाखल होता. सदर गुन्ह्याचे अनुषंगाने गुन्ह्याचा तपास करत असताना उंब्रज पोलिसांना गोपनीय बातमीदारांमार्फत सदर गुन्हा हा रेकॉर्डवरील आरोपी संकेत संतोष चव्हाण वय 20 वर्षे रा.लक्ष्मीनगर उंब्रज याने केला असल्याबाबत माहिती मिळाल्याने संशयित आरोपीतास शिताफीने ताब्यात घेऊन आरोपीकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता आरोपीने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्या पार्श्वभूमीवर आरोपीस अटक करण्यात आलेली असून आरोपीकडून गुन्ह्यात चोरीस गेलेले दोन चांदीचे छल्ले तसेच hp कंपनीचा लॅपटॉप असा ३६ हजार रुपयेचा पूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
सदरची कारवाई सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री तुषार दोशी,अपर पोलीस अधीक्षक श्रीमती डॉ वैशाली कडूकर, कराडचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली उंब्रज पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी एपीआय रवींद्र भोरे,पीएसआय रमेश ठाणेकर,पोलीस हवालदार सचिन मुळे, संजय धुमाळ, दिनेश भोसले, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत पवार,श्रीधर माने, मयूर थोरात, राजू कोळी यांनी केली आहे. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button