Uncategorized

नाणेगाव,कळंत्रेवाडी परिसरात डेंग्यू सदृश्य रुग्ण

(आरोग्य विभाग ॲक्शन मोडवर;ग्रामपंचायतींकडून सहकार्याची मागणी)

नाणेगाव,कळंत्रेवाडी परिसरात डेंग्यू सदृश्य रुग्ण
(आरोग्य विभाग ॲक्शन मोडवर;ग्रामपंचायतींकडून सहकार्याची मागणी)

उंब्रज/प्रतिनिधी

कराड तालुक्यातील कळंत्रेवाडी येथे पुनर्वसित झालेले नाणेगाव तसेच कळंत्रेवाडी या दोन्ही गावांमध्ये डेंग्यू सदृश्य रुग्ण सापडल्याची माहिती उंब्रजच्या प्राथमिक आरोग्य केंद्राने दिली आहे.त्यामुळे आरोग्य विभाग ॲक्शन मोडवर आला आहे. या परिसरात आरोग्य विभागामार्फत डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू असून ग्रामपंचायतीमार्फत डेंग्यूला आळा घालण्यासाठी पंधरा दिवसातून एकदा होम टू होम धूर फवारणी करणे गरजेचे आहे असे आवाहन उंब्रज प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी स्वप्नील उदगुडे यांनी केले आहे. याबाबत आरोग्य विभागाने दिलेल्या अधिक माहितीनुसार,नाणेगाव तसेच कळंत्रेवाडी या गावातील तीन रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणीसाठी आले असता केलेल्या तपासणीमध्ये ते डेंग्यू सदृश्य असल्याचे आढळून आले आहे.त्यांच्यावरती योग्य ते उपचार सुरू असून परिसरामध्ये आरोग्य विभागाकडून कंटेनर सर्वेक्षण मोहीम युद्धपातळीवर सुरू आहे. डास उत्पत्ती प्रतिबंधात्मक योग्य ती कार्यवाही आरोग्य विभागाने केलेली आहे.नागरिकांनी घरातील पाण्याचे साठे झाकून ठेवावेत, मच्छरदाणीचा वापर करावा, वेंट पाईपलाईनला जाळ्या बसवाव्यात,आठवड्यातील एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा, घर परिसर स्वच्छ ठेवावा, सतत ताप,डोकेदुखी यांसारखी लक्षणे दिसून आल्यास प्राथमिक आरोग्य केंद्र उंब्रज येथे तपासणीसाठी यावे असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

चौकट

आरोग्य विभागाने केल्या सर्व उपाययोजना,ग्रामपंचायतींकडून सहकार्याची आवश्यकता..!

नाणेगाव,कळंत्रेवाडी परिसरात डेंग्यू सदृश्य रुग्ण सापडल्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने आवश्यक त्या सर्व उपाययोजना केलेल्या आहेत. संबंधित ग्रामपंचायतींनी धुर फवारणी करून आरोग्य विभागाला सहकार्य करण्याची आवश्यकता आहे.
डॉ स्वप्निल उदगुडे

वैद्यकीय अधिकारी (उंब्रज प्राथमिक आरोग्य केंद्र)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button