Uncategorized

सपोनि रविंद्र भोरे यांची तत्परता

अवघ्या ३६ तासांमध्ये न्यायालयात दोषारोपपत्र सादर

सपोनि रविंद्र भोरे यांची तत्परता
(३६ तासात दोषारोपपत्र दाखल)

रघुनाथ थोरात

मौजे फडतरवाडी,ता.पाटण येथे महिलेचा विनयभंग व शिवीगाळ दाखल गुन्ह्यात आरोपीच्या विरोधात उंब्रज पोलिसांनी अवघ्या ३६ तासात पाटण न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.याबाबत उंब्रज पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,उंब्रज पोलीस ठाणे हद्दीतील मौजे फडतरवाडी,ता.पाटण येथे फिर्यादी यांच्या राहत्या घरी वडिलोपार्जित घराच्या वाटणीवरून फिर्यादी यांचा आरोपी दीर याने फिर्यादी यांना शिवीगाळ करून विनयभंग केला होता. याबाबत उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता.
पोलीस अधीक्षक श्री तुषार दोशी,अप्पर पोलीस अधीक्षक डॉ वैशाली कडूकर,उपविभागीय पोलीस अधिकारी कराड श्रीमती राजश्री पाटील यांनी महिला विषयक गुन्ह्यात तात्काळ कारवाई करून जलद गतीने न्याय मिळण्यासाठी लवकरात लवकर सखोल तपास करून दोषारोपपत्र माननीय न्यायालयात तत्काळ दाखल करणेबाबत सूचना दिलेल्या आहेत.उंब्रज पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी सपोनि रविंद्र भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रविंद्र कचरे यांनी गतिमान तपास करून ३६ तासात माननीय न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल केले आहे.सदर कामी PSI सागर खबाले,रमेश ठाणेकर,पो हवा सचिन जगताप,पोशि श्रीधर माने, प्रकाश कार्वेकर, प्रफुल पोतेकर, विकास शिंदे,प्रशांत पवार मदत केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button