Uncategorized

कळंत्रेवाडी हद्दीत मेगाब्लॉक

(उकरलेली पाईपलाईन, रुतलेल्या ऊसाच्या ट्रॅक्टरमुळे उडाला बोजवारा)

कळंत्रेवाडी हद्दीत मेगाब्लॉक
(उकरलेली पाईपलाईन, रुतलेल्या ट्रॅक्टरमुळे उडाला बोजवारा)

रघुनाथ थोरात

कळंत्रेवाडी,ता.कराड गावचे हद्दीत पाटण पंढरपूर राज्य मार्गाच्या विस्तारीकरणाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.परंतु, कळंत्रेवाडी हद्दीतील ईनामच्या पुलाजवळ अर्धवट उकरलेल्या अवस्थेतील पाईपलाईनमुळे तसेच हॉटेल मैत्री पार्क समोर अडकलेल्या ऊसाच्या ट्रॅक्टरमुळे ट्राफिक जाम होऊन मोठा मेगाब्लॉक पहावयास मिळाला. जवळपास चरेगावच्या दिशेने एक किलोमीटर पर्यंत तसेच उंब्रजच्या दिशेने एक किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची चांगलीच पंचाईत झाली. वास्तविक पाहता संबंधित ठेकेदाराने उकरलेल्या पाईपलाईनचे संपूर्ण काम करणे गरजेचे असताना रस्त्याची एक बाजू मुजवली व दुसरी बाजू तशीच अर्धवट सोडून दिल्यामुळे अरुंद असलेल्या एका बाजूकडून अवजड वाहने नेताना वाहने अडकत होती. त्यामुळे या ठिकाणी चक्काजाम झाल्याचे चित्र पहावयास मिळाले. त्यामुळे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागल्याच्या प्रतिक्रिया प्रवाशांनी दिल्या. एखादी रुग्णवाहिका या ट्राफिक मध्ये अडकून एखादा रुग्णाचा जीव गेला असता तर त्याला जबाबदार कोण? हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत असून प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे आणखी किती काळ या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वनवास सहन करावा लागणार? हा प्रश्न अनुत्तरितच आहे.

हा राज्यमार्ग याचे तरी भान असायला हवे होते…!

पश्चिम महाराष्ट्र व कोकणाला जोडणारा हा जवळचा राज्यमार्ग असल्यामुळे येथे नेहमीच मुंबई पुण्याच्या चाकरमान्यांसह स्थानिकांची सतत रहदारी सुरू असते.त्यामुळे या ठिकाणी गंभीर अपघाताचा धोका संभवतो. त्यामुळे उकरलेली पाईपलाईन पूर्ण करणे गरजेचे आहे.याचे तरी भान संबंधित यंत्रणेला असायला हवे होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button