आशा सेविका ललिता थोरात यांच्याकडून ऊसतोड मजुरांची आरोग्य तपासणी
(कुष्ठरोग निर्मूलन मोहिमेअंतर्गत कुसूम सर्व्हे)

आशा सेविका ललिता थोरात यांच्याकडून ऊसतोड मजुरांची आरोग्य तपासणी
(कुष्ठरोग निर्मूलन मोहिमेअंतर्गत कुसूम सर्व्हे)
रघुनाथ थोरात
महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाकडून कुष्ठरोग निर्मूलन मोहिमेअंतर्गत 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी पर्यंत कुसुम सर्व्हे सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर कळंत्रेवाडी,ता.कराड येथील आशा सेविका ललिता थोरात यांनी ऊसतोड मजुरांची आरोग्य तपासणी करीत थंडी,ताप,सर्दी, कणकण या आजारांवर प्रथमोपचार देखील केले. ऊसतोड मजुरांच्या मुलांच्या अंगावरती असलेले पांढरे चट्टे तपासून बधिरता,संवेदनेच्या चाचण्या करण्यात आल्या. महाराष्ट्र शासनाकडून कुष्ठरोग निर्मूलन मोहिमेअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या कुसूम सर्व्हे अंतर्गत ऊसतोड मजूर,वीट भट्टी कामगार,बिगारी कामगारांच्या शारीरिक तपासण्या करून कुष्ठरोगाची लक्षणे आढळणाऱ्या व्यक्तींवर पुढील योग्य ते उपचार करण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.



