अखेर पोलीस पाटील जयसिंग येळवे यांनी हलवली सूत्रं.. अन रस्ता खुला झाला

अखेर पोलीस पाटील जयसिंग येळवे यांनी हलवली सूत्रं.. अन रस्ता खुला झाला
रघुनाथ थोरात
कळंत्रेवाडी, ता.कराड गावच्या हद्दीत ईनामच्या पुलाजवळ पाईपलाईनच्या अर्धवट सोडलेल्या कामामुळे तसेच अडकलेल्या ऊसाच्या ट्रॅक्टरमुळे चक्काजाम होऊन लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. ज्या ठिकाणी पाईपलाईन उकरण्यात आली. त्या ठिकाणी रस्ता अतिशय अरुंद असल्यामुळे तसेच रोलिंग न केल्यामुळे मालवाहतुकीची अवजड वाहने,एसटी अडकून वाहतुकीचा बोजवारा उडाला होता. दरम्यान, याची माहिती कळंत्रेवाडीचे पोलीस पाटील जयसिंग येळवे यांना लागताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत खरी सूत्रे हलवली. संबंधित अधिकारी तसेच पोलीस प्रशासनास याबाबतची खबर देण्यात आली. काही वेळातच पोकलेन,रोलर यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. सदर ठिकाणी भर टाकण्याबरोबरच रस्ता रुंद करून रोलिंग करण्यात आले. त्यामुळे अखेर वाहतूक खुली झाली आणि सर्वांनी सुटकेचा श्वास टाकला. पोलीस पाटील जयसिंग येळवे, पत्रकार रघुनाथ थोरात यांनी जवळपास मध्यरात्री बारापर्यंत जातीने उभे राहून सदरची समस्या निकालात काढली अनं अखेर वाहतूक खुली झाली. वेळ काळ याचे भान न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत समाजासाठी कार्यरत राहण्याचा आदर्शच जणू या घटनेतून पोलीस पाटील जयसिंग येळवे यांनी घालून दिला आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही..!




