श्री हणमंत थोरात यांची वाहतूक नियंत्रकपदी बढती
(एकोणतीस वर्षांच्या वाहक कारकीर्दीचा झाला सन्मान)


श्री हणमंत थोरात यांची वाहतूक नियंत्रकपदी बढती
(एकोणतीस वर्षांच्या वाहक कारकीर्दीचा झाला सन्मान)
रघुनाथ थोरात
कळंत्रेवाडी,ता.कराड गावचे सुपुत्र श्री हणमंत आप्पासो थोरात यांना नुकतीच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून वाहतूक नियंत्रकपदी बढती मिळाली आहे. त्यामुळे त्यांनी वाहक म्हणून बजावलेल्या सुमारे एकोणतीस वर्षांच्या कारकिर्दीचा सन्मान झाल्याची भावना उंब्रज परिसरातून व्यक्त होत आहे. हणमंत थोरात सन १९९७ साली महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामध्ये वाहक म्हणून पाटण आगारामध्ये रुजू झाले. त्यानंतर पारगाव खंडाळा,मेढा, कराड,सातारा या आगारांमध्ये वाहकपदी जवळपास एकोणतीस वर्ष सेवा बजावली आहे. त्यानंतर सातारा येथे खात्याअंतर्गत ०३ मार्च २०२४ रोजी घेण्यात आलेल्या वाहतूक नियंत्रक परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्यामुळे हणमंत थोरात यांची वाहतूक नियंत्रक पदी बढती झाली आहे. एक सप्टेंबर रोजी पाटण आगारा अंतर्गत येणाऱ्या तारळे पॉईंटवर वाहतूक नियंत्रकपदी थोरात रुजू होणार आहेत. शासकीय सेवेत मिळालेल्या बढतीमुळे उंब्रज परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.




