Uncategorized

टांगा पलटी घोडे फरार…!

(बातमीच्या धसक्याने चोरलेली सायकल टाकली नदीपात्रात)

टांगा पलटी घोडे फरार…!
(बातमीच्या धसक्याने चोरलेली सायकल टाकली नदीपात्रात)

रघुनाथ थोरात

कळंत्रेवाडी,ता.कराड येथील ग्रामपंचायत कर्मचारी अनिल वसंत थोरात यांच्या गोठ्याजवळ लावलेली सायकल काल चोरीस गेली होती.दरम्यान,याबाबतचे वृत्त लोकदवंडी न्यूजने प्रसिद्ध करताच त्याचा धसका घेत अज्ञाताने चोरलेली सायकल उत्तरमांड नदीपात्रात टाकून दिली सर्व प्रकार आज बुधवार दिनांक 19 नोव्हेंबर रोजी सकाळी उघडकीस आला. दरम्यान, याबाबत गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार,अज्ञाताने अनिल वसंत थोरात यांची चोरलेली सायकल उत्तरमांड नदी काठालगतच्या उसाच्या शेतात ठेवली होती. वातावरण शांत झाल्यानंतर चोरलेली सायकल विकण्याचा त्याचा मनसुबा होता. परंतु,सायकल चोरीचे वृत्त प्रसिद्ध झाल्यामुळे वातावरण शांत न होता सायकल चोरीची घटना परिसरात वाऱ्यासारखी पसरल्यामुळे उलटसुलट चर्चांना उधाण आले होते. त्यामुळे अज्ञात सायकल चोराची चांगलीच तंतरली. आता आपली काही खैर नाही. आपली चोरी पकडली जाणार या भीतीने त्याने मध्यरात्रीच उसाच्या शेतात ठेवलेली सायकल उत्तरमांड नदीपात्रात टाकून दिली. हा सर्व प्रकार सकाळी ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी अनिल थोरात यांना तुमची सायकल उत्तरमांड नदीपात्रात असल्याचे सांगितले. त्यामुळे सायकल चोरीच्या प्रसिद्ध झालेल्या बातमीमुळे अवघ्या काही तासांतच अनिल थोरात यांना त्यांची सायकल परत मिळाली अनं चोराने आखलेला सायकल चोरीचा डाव उधळला गेल्याची चर्चा नागरिकांमध्ये चांगलीच रंगली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button