महाराष्ट्र ग्रामीण

नेवासा मध्ये 21 जुलै कामिका एकादशी निमित्त वाहतुकीत बदल

नेवासा ( प्रतिनिधी ) – दिनांक 21 जुलै 2025 रोजी कमिका एकादशी निमित्त नेवासा शहरातील वाहतुकीत खालील प्रमाणे बदल करण्यात आलेला आहे.

१) नेवासा फाटा ते श्रीरामपुरकडे जाणारे वाहनांकरीता मार्ग-
i) नेवासा फाटा- प्रवरासंगम- सिद्धेश्वर मंदिर- वाशिम टोका- गोधेगाव- भालगांव- नेवासा बु. – टाकळीभान- श्रीरामपुर

२) श्रीरामपुर ते नेवासा फाटा ते शेवगावकडे जाणारे वाहनांकरीता मार्ग*
i) श्रीरामपुर- टाकळीभान- नेवासा बुद्रुक- भालगाव- गोधेगाव- वाशिम टोका- सिध्देश्वर मंदिर-प्रवरासंगम- नेवासा फाटा- शेवगाव
वरील आदेश शासकीय वाहने, ॲम्बुलन्स, फायर ब्रिगेड व स्थानिक प्रशासनाने अत्यावश्यक कारणास्तव परवानगी दिलेल्या वाहनांना लागु राहणार नाही.

🅿️ “भक्त भाविकांच्या वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था पुढीलप्रमाणे”

१. नेवासा फाट्याकडून येणाऱ्या वाहन करता कृषी उत्पन्न बाजार समिती (मार्केट कमिटीचे) ग्राउंड

२. श्रीरामपूरकडून येणाऱ्या वाहनांसाठी नेवासा बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळा

३. राहुरी खूपटीकडून येणाऱ्या वाहनांसाठी खूपटी रोड वरील ईदगाह मैदान . . .

४. केवळ दुचाकी वाहनांसाठी नेवासा शहरात एस.टी. स्टँड, पंचायत समिती मैदान आणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा.

टिप:- स्थानिक रहिवाशांनी उद्या 21 जुलै रोजी चार चाकी वाहनांचा उपयोग टाळावा.

धनंजय अ. जाधव.
पोलीस निरीक्षक,
पोलीस ठाणे नेवासा.
9011581111
9422581111
9923581111
9960581111

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button