संग्रामसिंह रणसंग्रामासाठी सज्ज..!
(जोरदार शक्ती प्रदर्शन; माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे उमेदवारीची मागणी)

संग्रामसिंह रणसंग्रामासाठी सज्ज..!
(जोरदार शक्ती प्रदर्शन; माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे उमेदवारीची मागणी)
रघुनाथ थोरात
कराड तालुक्यातील उंब्रज नगरीच्या इतिहासात दोन पिढ्यांचा सुसंस्कृत,समृद्ध, दैदिप्यमान,विकासात्मक वारसा लाभलेले उभरते युवा नेतृत्व संग्रामसिंह जयवंतराव उर्फ हंबीरराव जाधव हे होऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उंब्रज जिल्हा परिषद गटातून राजकीय रणसंग्रामासाठी सज्ज झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी शनिवार दिनांक 18 डिसेंबर रोजी शक्ती प्रदर्शन करत माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या कराड येथील निवासस्थानी त्यांची भेट घेत उंब्रज जिल्हा परिषद गटातून जिल्हा परिषदेच्या उमेदवारीची मागणी केली.संग्रामसिंह जाधव यांचे आजोबा कै वसंतराव जाधव हे आदरणीय कै पी डी पाटील साहेब यांचे निष्ठावंत म्हणून उंब्रज पंचक्रोशीत परिचित होते. कै वसंतराव जाधव यांनी सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या व्हाईस चेअरमन पदाची धुरा समर्थपणे पेलेली होती. त्यानंतर त्यांचे चिरंजीव जयवंतराव उर्फ हंबीरराव जाधव(मामा) यांनी आपल्या वडिलांचा राजकीय, सामाजिक वारसा पुढे चालवत जिल्हा परिषद सदस्य,सह्याद्री साखर कारखान्याचे संचालक आदि पदे भूषवून आपल्या कार्यकर्तुत्वाचा ठसा उमटवलेला आहे. दोन पिढ्यांचा वारसा लाभलेले संग्रामसिंह हे बीएससी ऍग्री आहेत. शेतीमध्ये आधुनिक पद्धतीचा अवलंब करीत विविध प्रयोग राबवणारे युवा प्रगतिशील शेतकरी म्हणून ते उंब्रज पंचक्रोशीत प्रसिद्ध आहेत. त्यामुळे संग्रामसिंह जाधव यांना लाभलेला तीन पिढ्यांचा राजकीय वारसा,अंगीभूत असलेला संयमीपणा,अभ्यासू वृत्ती तसेच सामाजिक विकासाची धडपड या त्यांच्या जमेच्या बाजू असल्याकारणाने उंब्रज आणि पंचक्रोशीचा सर्वांगीण विकास साधता येणे शक्य आहे.अशा युवा नेतृत्वाला संधी द्यावी अशी आग्रही मागणी संग्रामसिंह जाधव मित्रपरिवार तसेच चौबुर्जी युवा मंचाच्या कार्यकर्त्यांनी माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे केली आहे. यावेळी उंब्रजचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व,पंचायत समितीचे माजी उपसभापती दिलीपराव जाधव यांच्यासह चौबुर्जी युवा मंच, संग्रामसिंह जाधव मित्रपरिवारातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.


