छत्रपती शिवाजी महाराज नेत्र रुग्णालयाने जपली सामाजिक बांधिलकी
(वारकऱ्यांची आरोग्य तपासणी, औषध फळे वाटप)



छत्रपती शिवाजी महाराज नेत्र रुग्णालयाने जपली सामाजिक बांधिलकी
(वारकऱ्यांची आरोग्य तपासणी, औषध फळे वाटप)
रघुनाथ थोरात
उंब्रज,ता.कराड येथील छत्रपती शिवाजी महाराज नेत्र रुग्णालयाने सामाजिक बांधिलकी जपत वारकऱ्यांच्या आरोग्य तपासणी सोबत वारकऱ्यांना आवश्यक त्या औषधांचे तसेच फळांचे वाटप शामगाव येथील शिवमंदिर परिसरात नुकतेच केले. आपण समाजाचं काहीतरी देणे लागतो या सामाजिक तळमळीतून रुग्णालयाची आजवरची वाटचाल सुरू आहे. उंब्रज परिसरातील ग्रामीण भागात वरचेवर नेत्र शिबिरांचे आयोजन करून अत्यंत वाजवी दरात रुग्णांना हॉस्पिटलकडून आवश्यक त्या सुविधा पुरविण्यात येतात.त्यामुळे कराड तालुक्यात हॉस्पिटलचा नावलौकिक झाला आहे. दरम्यान, यावेळी डॉ राहुल बोराडे, डॉ मिनल भोसले, दिपाली लाखे, आकांक्षा शेंडगे,मंगेश शिवदास, संगीता माने,पत्रकार सत्यवान मोरे आदि उपस्थित होते.



