Uncategorized

रस्त्याच्या साईड पट्ट्या खचल्या

(दुचाकी घसरण्याचा धोका)

रस्त्याच्या साईड पट्ट्या खचल्या
(दुचाकी घसरण्याचा धोका)

रघुनाथ थोरात

उंब्रज ते चरेगाव,ता कराड दरम्यानच्या परिसरात पाटण पंढरपूर राज्य मार्गावर जिथे काँक्रीटीकरणाचे काम पूर्ण झाले आहे तेथील साईड पट्ट्या मुरूम टाकून भरण्यात आलेल्या आहेत. परंतु,काही ठिकाणी भरलेल्या साईड पट्ट्या खचू लागल्याने या ठिकाणी रात्रीच्या वेळेस अंदाज न आल्यास दुचाकी घसरून गंभीर अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. दरम्यान,गुरुवार दिनांक 19 मार्च रोजी रात्री सात वाजता चरेगाव कडून उंब्रजच्या दिशेने निघालेला दुचाकीस्वार रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे रस्ता सोडून साईड पट्टी वरती गेला आणि दुचाकी रस्त्यावरून घसरल्यामुळे जखमी झाल्याची घटना घडली. दुचाकीवर पुढे बसलेल्या व्यक्तीचा उजव्या हाताला दुखापत झाली तर पाठीमागे बसलेल्या व्यक्तीचा डाव्या पायाचा गुडघा दुखावला आहे. केवळ दैव बलवत्तर म्हणून हे दोन्ही प्रवासी बाल बाल बचावले.त्यामुळे खचलेल्या साईड पट्ट्या पुन्हा एकदा भरून घ्याव्यात अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button