Uncategorized

बिबट्याच्या हल्ल्यात जर्मन शेफर्ड कुत्रे ठार

(घटना सीसीटीव्हीमध्ये कैद; नागरिक भयभीत)

 

बिबट्याच्या हल्ल्यात जर्मन शेफर्ड ठार
(घटना सीसीटीव्हीमध्ये कैद; नागरिक भयभीत)

कळंत्रेवाडी,ता.कराड येथील माजी सैनिक सचिन सूर्यवंशी यांचा जर्मन शेफर्ड जातीचा पाळीव कुत्रा बिबट्याने ठार केला. सदरची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून नागरिक भयभीत आहेत. याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, बुधवार दिनांक २ जुलै रोजी पहाटे तीनच्या सुमारास बिबट्याने सचिन सूर्यवंशी यांच्या बंगल्याच्या कंपाऊंडच्या आतमध्ये प्रवेश करत त्यांचे जर्मन शेफर्ड जातीच्या पाळीव कुत्र्यावर हल्ला करीत ठार गेले.त्यानंतर बिबट्याने कुत्र्याला अक्षरशः फरपटत नेऊन परिसरातील ऊसाच्या शेतामध्ये टाकले. नेहमीप्रमाणे सकाळी उठल्यानंतर सुभाष सूर्यवंशी यांनी आपले कुत्रे दिसत नाही म्हटल्यानंतर सर्वत्र शोधा शोध केली असता बिबट्याच्या पायाचे ठसे तसेच कुत्र्याला फरपटत नेल्याच्या खुणा आढळून आल्या. त्यानुसार बिबट्याचा माग काढला असता परिसरातील एका ऊसाच्या शेतापलीकडील बांधावर कुत्रे ठार झालेल्या अवस्थेत आढळून आले. या परिसरात पाळीव कुत्र्यांवर बिबट्याच्या सततच्या हल्ल्यांमुळे नागरिक भयभीत असून आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. त्याचबरोबर वासरे, शेळ्या,कोकरे, रेडकू यांसारख्या पाळीव पशुधनावर हल्ले होण्याची भीती वाढली आहे. प्रशासनाने याची योग्य ती दखल घेत उपाययोजना करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

प्रशासनाला जाग केव्हा येणार?

या परिसरात मानवी वस्तीत येऊन बिबट्याचे कुत्र्यांवरील हल्ले दिवसेंदिवस वाढत चालले असून भविष्यात बिबट्याच्या हल्ल्यामध्ये एखाद्या नागरिकाचा मृत्यू झाल्यानंतरच प्रशासनास जाग येणार का? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button