Uncategorized

सामाजिक कार्यकर्ते सचिन पवार यांनी स्वखर्चाने केले झाडांचे संरक्षण

(झाडांना संरक्षण कट्टे,बैठक व्यवस्था,ध्वजस्तंभाचा समावेश)

 

सामाजिक कार्यकर्ते सचिन पवार यांनी स्वखर्चाने केले झाडांचे संरक्षण
(झाडांना संरक्षण कट्टे,बैठक व्यवस्था,ध्वजस्तंभाचा समावेश)

रघुनाथ थोरात

शिवाजीनगर(मांगवाडी),ता. कराड येथील टिंबर व्यवसायिक,सामाजिक कार्यकर्ते सचिन पवार यांनी येथील जिल्हा परिषद शाळेच्या परिसरातील झाडांभोवती स्वखर्चाने संरक्षण कट्टे बांधले असून परसबाग देखील तयार केली आहे. त्याचबरोबर शाळा परिसरात ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी सिमेंटची बाकडी देऊन शाळेचा ध्वजस्तंभ देखील तयार करून दिला आहे. यांच्या पत्नी सौ सुरेखा पवार सध्या शिवाजीनगरच्या सरपंचपदी कार्यरत आहेत तर सचिन पवार हे सामाजिक क्षेत्रात अग्रेसर आहेत.शिवाजीनगरच्या सर्वांगीण विकासासाठी पवार दांपत्य निस्वार्थी भावनेने अहोरात्र काम करत आहेत. त्यामुळे उंब्रज परिसरासाठी पवार कुटुंब एक आदर्शवत कुटुंब आहे.असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. सामाजिक कार्यकर्ते सचिन पवार यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक उंब्रज परिसरातून होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button