Uncategorized

शिवाजीनगर येथे आरोग्य शिबिर संपन्न

(प्राथमिक आरोग्य केंद्र,हनुमान गणेश भजनी मंडळ तसेच ग्रामपंचायतीचा संयुक्त उपक्रम)

शिवाजीनगर येथे आरोग्य शिबिर संपन्न
(प्राथमिक आरोग्य केंद्र,हनुमान गणेश भजनी मंडळ तसेच ग्रामपंचायतीचा संयुक्त उपक्रम)

रघुनाथ थोरात

शिवाजीनगर,ता.कराड येथे प्राथमिक आरोग्य केंद्र उंब्रज, हनुमान गणेश भजनी मंडळ तसेच ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने गणेश उत्सवानिमित्त दिनांक १४ सप्टेंबर रोजी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते सचिन पवार यांनी दिली. सदर आरोग्य शिबिरात स्वास्थ नारी सशक्त परिवार अंतर्गत जवळपास १९४ लोकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.यामध्ये बीपी, शुगर तपासण्यात आली. जवळपास २५ नागरिकांचे आयुष्मान भारत इ कार्ड, ३७५ नागरिकांचे ENCD मध्ये आभा कार्ड, वयश्री कार्ड काढण्यात आले. जवळपास ७८ नागरिकांची रक्त तपासणी करण्यात आल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते सचिन पवार यांनी दिली. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ श्रेया खंडागळे, अमित जाधव, आरोग्य सेवक एस एम ठाकरे, श्रीमती शकुंतला कांबळे,श्रीमती मनीषा कोळेकर, आरोग्य सेविका श्रीमती तेजस्विनी घाडगे, गटप्रवर्तक श्रीमती चैताली कापले,महा लॅब टेक्निशियन पायल जाधव,NCD सुपरवायझर श्रीमती रेश्मा शिंदे, आरोग्य सहाय्यक दिगंबर भोसले, वाहनचालक सागर जाधव, सर्व आशाताई तसेच सरपंच सौ सुरेखा पवार, ग्रा पं सदस्य विक्रम साळुंखे,समाधान बोरगे,सुनिता सुळे,सुरेखा पवार, अश्विनी भोंडगे, पोलीस पाटील शंकर घाडगे, तंटामुक्तीचे अध्यक्ष सुनील पवार, आशा सेविका विद्या सुळे, सीआरपी प्रियांका दौंडे,कृषी सखी सोनाली साळुंखे आदि उपस्थित होते. सदर आरोग्य शिबिराचा ग्रामस्थ महिला,पुरुष यांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button