Uncategorized

आमदार मनोज दादांचे कळंत्रेवाडीवर विशेष लक्ष.. गणेश मंदिरासाठी मंजूर केले पाच लक्ष..

आमदार मनोज दादांचे कळंत्रेवाडीवर विशेष लक्ष..
गणेश मंदिरासाठी मंजूर केले पाच लक्ष..

रघुनाथ थोरात

कळंत्रेवाडी,ता.कराड येथील बऱ्याच वर्षांपासून रखडलेल्या गणेश मंदिराच्या पूर्णत्वाचा मार्ग कराड उत्तरचे लोकप्रिय, कार्यसम्राट आमदार माननीय मनोज दादा घोरपडे यांच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या मोलाच्या मदतीमुळे मोकळा होणार आहे. सध्या गणेश मंदिराचे काम अखेरच्या टप्प्यात आलं आहे.सभामंडप सुशोभीकरण,फेवर ब्लॉक्स, संरक्षण भिंत,गाभारा सुशोभीकरण तसेच मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना आदि कामे बऱ्याच कालावधीपासून रखडलेली आहेत.दरम्यान, याबाबतची इत्यंभूत माहिती सामाजिक कार्यकर्ते,पत्रकार रघुनाथ थोरात यांनी आमदार मनोज दादा घोरपडे यांचे अत्यंत जवळचे विश्वासू,निष्ठावंत आनंदपुरचे युवा कार्यकर्ते सागर थोरात यांच्या माध्यमातून आमदार मनोज दादा घोरपडे यांच्या कानावरती घातली होती. तसेच भाजपचे बुथ प्रमुख,उपसरपंच दिलीप यादव यांनी केलेल्या पाठपुराव्याची तात्काळ दखल घेत आमदार मनोज दादा घोरपडे यांनी गणेश मंदिराच्या सभामंडप सुशोभीकरणासाठी आमदार फंडातून पाच लाख मंजूर केले आहेत. त्यामुळे गणेश मंदिराच्या अखेरच्या टप्प्यात रखडलेली कामे पूर्णत्वास जाण्याचा मार्ग मोकळा झाला असून या निमित्ताने आमदार मनोज दादा घोरपडे यांच्या संवेदनशील मनाचे दर्शन झाल्याची भावना कळंत्रेवाडीचे नागरिक व्यक्त करीत आहेत.

आमदार साहेबांच्या संवेदनशीलतेचे दर्शन…!

आमदार मनोज दादा घोरपडे यांनी कळंत्रेवाडीच्या गणेश मंदिराच्या बांधकामाचा रखडलेला प्रश्न मार्गी लावल्यामुळे आमदार साहेबांच्या संवेदनशील मनाचे दर्शन झाल्याच्या भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button