Uncategorized

बिबट्याच्या हल्ल्यात कुत्रा जखमी

(घटनास्थळी वनविभागाची धाव)

बिबट्याच्या हल्ल्यात कुत्रा जखमी
(घटनास्थळी वनविभागाची धाव)

रघुनाथ थोरात

नाणेगाव(पुनर्वसन), ता.कराड परिसरात वास्तव्यास असलेले वखार व्यवसायिक सचिन उत्तम पवार यांच्या पाळीव कुत्र्यावर बिबट्याने हल्ला करत जखमी केल्याची घटना घडली असून याची माहिती लागताच वनविभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिसराची पाहणी केली. याबाबत सचिन पवार यांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार,बुधवार दिनांक २० ऑगस्ट रोजी मध्यरात्री दीडच्या सुमारास कंपाउंडमध्ये बांधलेल्या कुत्र्याचा ओरडण्याचा आवाज आल्यामुळे पवार यांना जाग आली.त्यानंतर त्वरित दरवाजा उघडून बाहेर गेले असता चाहूल लागल्यामुळे बिबट्याने धूम ठोकली.दरम्यान,बिबट्यासोबत झालेल्या झटापटीत कुत्रा जखमी झाला असून पाठीवर,गळ्यावर बिबट्याच्या नख्यांचे ओरखडे दिसून आले आहेत.याची माहिती वनविभागाचे शंभूराज माने यांना लागताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिसराची पाहणी केली. सचिन पवार यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे बिबट्याच्या हल्ल्यातून सुदैवाने कुत्रा थोडक्यात बचावला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button