महाराष्ट्र ग्रामीण

कालभैरवनाथाच्या तीर्थक्षेत्र बहिरवाडी मुख्य रस्त्याचे 3.5 कोटी रु चे स्वामी प्रकाशानंदगिरी यांच्या हस्ते भूमिपूजन…

“चौकट… अनेक दिवसाच्या निधीच्या प्रतिशत असलेले सर्व प्रलंबित कामे प्रथमदर्शनी मार्गी लावणार… लवकरच श्री क्षेत्र देवगड प्रवरा नदीवरील तेरा गावांना जोडणारा 2.5 कोटी चा पादचारी पुलाचे भूमिपूजन करणार…आमदार श्री. विठ्ठलराव लंघे विधानसभा सदस्य नेवासा .” 

 

रस्त्याच्या कामासाठी सहकार्य करणाऱ्या दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांना कालभैरवनाथ व नाथभक्त निश्चितच भरभरून आशीर्वाद देतील…

ह .भ. प.स्वामी प्रकाशनंदगिरीजी महाराज
श्री क्षेत्र देवगड संस्थान

नेवासा ( प्रतिनिधी ) –
नेवासा बुद्रुक ते बहिरवाडी,बहिरवाडी ते भालगाव या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ देवगड संस्थांनचे उत्तराधिकारी स्वामी प्रकाशनंदगिरी महाराज यांच्या शुभहस्ते आमदार विठ्ठलराव लंघे , नगराध्यक्ष डॉ. करणसिंग घुले, ॲड.अनिल मारकळी, प्रभाकर बोरकर , अनिल बोरकर, ह. भ प.विजय महाराज पवार, ह भ प रामनाथ महाराज पवार, ह .भ .प . लक्ष्मण महाराज नांगरे.बहिरवाडी देवस्थानचे अध्यक्ष अशोक कोलते, विश्वस्त सिताराम घोरपडे ,बाबासाहेब वाखुरे, माजी सरपंच नंदकुमार वाखुरे, माजी सरपंच सुनील हारदे, अशोक नांगरे, ज्ञानेश्वर पेचे,भाऊसाहेब वाघ, प्रताप चिंधे, राजेंद्र मते, सौ भारतीताई बेद्रे, बहिरवाडीचे सरपंच आनंद नांगरे या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी बोलताना स्वामी प्रकाशनंदगिरी महाराज म्हणाले की, रस्त्याचे काम सुरु झाले कालभैरवनाथ भक्तांच्या दृष्टीने अतिशय आनंदाची गोष्ट आहे गुरुवर्य भास्करगिरी बाबांनी नेते मंडळीं , ग्रामस्थांना विश्वस्तांना सांगितलं रस्त्याचे काम मार्गी लागणे नितांत गरजेचं आहे, बरेच वर्षापासून कामामध्ये काही अडथळा येत होता परंतु भैरवनाथांनीच कृपा केली आणि यावर्षी या रस्त्याचा कामाचा आहे. देवस्थानचा विकास दळणवळणावर अवलंबून असतो त्यासाठी रस्ते चांगले असले पाहिजे . या रस्त्या करता सगळ्यांनी सहकार्य केलं त्यांना आम्ही मनापासून धन्यवाद देतो. राज्यभरातून भक्त या ठिकाणी दर्शना करता येतात ज्यावेळेला रस्त्याचे काम अधिक चांगल्या प्रकारे होईल त्यांच्या मनाला आनंद मिळणार आहे .
कुठलही क्षेत्र असो रस्ता चांगला असावा लागतो भगवंत प्राप्ती साठी तुका म्हणे सोपी केली पायवाट तरावया भवसागर रस्ता जर चांगला असेल तर ध्येय प्राप्ती होते. हा रस्ता चांगला करावा नाहीतर काम झाल्यावर काही काळाने खड्डे पडले असे नको मजबूत रस्ता व्हावा अशी कामना व्यक्त करतो.
आमदार लंघे म्हणाले की, लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले हे मंदिर आहे त्याला जाण्या येण्याच्या रस्त्याचे काम रखडले होते. ते आज सुरु होत आहे. रस्याचे काम व्हावे हि बाबांची ईच्छा आहे. आपला तालुका साधु संताच्या पदस्पर्शाने पुनीत झालेला आहे. ज्यावेळेस देवस्थान ला दळणवळणाची सुविधा होते त्यावेळेस भाविकांचा ओघ वाढतो.
यावेळी अनिल मारकळी,बाळासाहेब मारकळी, अनिल बोरकर,मनोज बोरकर, प्रभाकर बोरकर, संजय मारकळी, रवींद्र मारकळी , राजेंद्र मुरूमकर, दादासाहेब उदागे, कालभैरवनाथ देवस्थानचे अध्यक्ष अशोक कोलते, भास्कर मिटकरे सिताराम घोरपडे बाबासाहेब वाखुरे, दुर्योधन भोंगळ भाऊसाहेब राऊत, अनिल घोरपडे बाबासाहेब कोलते दिगंबर घोरपडे, ,मधुकर हारदे,डॉ. संतोष शेळके,रामनाथ हेलवडे , राजेंद्र मिटकरे लक्ष्मण पंडित कैलास हेलवडे ,दीपक वाखुरे राजेंद्र पटारे,प्रदीप जाधव बाळासाहेब पवार, अजय साबळे,आदिनाथ पटारे, प्रशांत बहिरट, कुणाल बोरुडे ,रामेश्वर गाडेकर राजेंद्र वाखरे, संभाजी शेळके, भारत कोलते,राहुल शेळके, सोमनाथ वाखुरे, आदिनाथ वाखुरे, कॉन्ट्रॅक्टर बाळासाहेब कचरे यांच्यासह असंख्य बहिरवाडी, धामोरी नेवासा बुद्रुक भालगाव , उस्थळ खालचा परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button