चाफळ विभागातील जि प शाळेच्या विद्यार्थ्यांना छत्र्यांचे वाटप
(पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई यांची प्रेरणा)

चाफळ विभागातील जि प शाळेच्या विद्यार्थ्यांना छत्र्यांचे वाटप
(पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई यांची प्रेरणा)
रघुनाथ थोरात
सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार श्री शंभूराज देसाई साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रेरणेने चाफळ विभागातील डोंगराळ व दुर्गम भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पालकमंत्री शंभूराज देसाई साहेबांचे चाफळ विभागातील निष्ठावंत कार्यकर्ते श्री भरत साळुंखे उर्फ भाऊ यांनी छत्र्यांचे वाटप केले. महाबळवाडी, दाढोली,मसुगडेवाडी,खोनोली, कोचरेवाडी,मधलीवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना सोमवारी कोअर कमिटी चाफळ विभागाच्या वतीने छत्र्या देण्यात आल्या. पावसाळ्यात शाळेत जाताना विद्यार्थ्यांना होणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन या उपक्रमाचे अंमलबजावणी करण्यात आल्याचे श्री भरत साळुंखे यांनी सांगितले. छत्र्या मिळाल्याने पावसाच्या सरींपासून संरक्षण मिळणार असल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे गोड हास्य फुलले. हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरला असून पालकांनीही समाधान व्यक्त केले.दरम्यान, अतिवृष्टीमुळे दोन दिवस शाळांना सुट्टी असल्यामुळे सध्या छत्री वाटप थांबवण्यात आले असून शाळा सुरू झाल्यानंतर उर्वरित शाळांमध्ये छत्री वाटप करण्यात येणार आहे.यावेळी भरत साळुंखे अध्यक्ष संजय गांधी निराधार समिती पाटण, प्रशांत पाटील संचालक लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना, चंद्रकांत पाटील संचालक बँक, राजेंद्र पाटील संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती, जयदीप पाटील संचालक शिवशंभो दूध संघ, संदीप यादव आदि उपस्थित होते




