Uncategorized

जाधववाडीचे जवान रणजित गुजर यांचे जल्लोषात स्वागत

(देशसेवेचा उचित सन्मान)

जाधववाडीचे जवान रणजित गुजर यांचे जल्लोषात स्वागत
(देशसेवेचा उचित सन्मान)

रघुनाथ थोरात

जाधववाडी,ता.पाटण गावचे सुपुत्र,भारतीय स्थलसेनेतून सेवानिवृत्त झालेले माजी सैनिक रणजित गुलाबराव गुजर यांचे गावांमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले.फुलांनी सजवलेल्या जीपमधून गुजर यांची गावातून सहकुटुंब मिरवणूक काढण्यात आली. त्यामुळे देशसेवेत अवघी हयात खर्ची घातलेल्या वीर जवानाचा उचित सन्मान झाल्याची भावना परिसरातून व्यक्त होत आहे. १२ ऑगस्ट २००६ साली कोल्हापूर बी आर ओ मधून सातारा येथे भरती झालेले रणजित गुजर ३१ ऑगस्ट २०२५ रोजी नाशिक येथून हवालदार या पदावर कार्यरत असताना सेवानिवृत्त झाले. दिल्ली,जम्मू-काश्मीर, अरुणाचल प्रदेश,सिक्कीम नाशिक या ठिकाणी ३६(मराठा) मिडीयम रेजिमेंटमध्ये गुजर यांनी आपली सेवा बजावली आहे. कुटुंबासह गुजर यांना पुढे फुलांनी सजवलेल्या जीपमध्ये बसवण्यात आले होते. तर पाठीमागे चार ते पाच गाड्यांच्या ताफ्यासह माजी सैनिक रणजित गुजर यांनी गावात प्रवेश केला. त्यानंतर संपूर्ण गावातून त्यांची मोठ्या जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीदरम्यान गावातील महिलांनी ठिकठिकाणी त्यांचे औक्षणही केले. त्यामुळे देशसेवेसाठी अवघी हयात खर्ची घातलेल्या वीर जवान रणजित गुजर यांचा उचित सन्मान झाल्याच्या भावना परिसरातून व्यक्त होत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button