
इंदोलीत सजले ‘उमेद’ चे स्टॉल
(स्वयंसहाय्यता समूहाच्या महिलांचा अभिनव उपक्रम)
रघुनाथ थोरात
इंदोली,ता.कराड येथे एकता महिला ग्रामसंघ तसेच स्वाभिमानी महिला ग्रामसंघातील महिलांनी एकत्र येत गौरीच्या फराळाचे व साहित्याचे सहा स्टॉल लावले आहेत. महिलांना उपजीविकेचे साधन मिळण्याबरोबरच अर्थार्जन व्हावे हा या स्टॉल उभारणी पाठीमागचा उद्देश असल्याचे उंब्रज,पाल प्रभाग समन्वयक माधवी वनारसे यांनी सांगितले. संगीता निकम,अश्विनी लोकरे, जयश्री कुंभार,विजया निकम, रूपाली गायकवाड,रसीदा शेख या महिलांनी गौरी फराळ, मुखवटे,हात,बॉडी,नोनकेट, बिस्किटे,गौरीचे दागिने आदी वस्तू या स्टॉलच्या माध्यमातून रास्त दरामध्ये विक्रीस उपलब्ध केलेल्या आहेत. सदर स्टॉल्सना महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून दोन दिवसांमध्ये जवळपास साडेआठ हजार रुपयांची विक्री झाली आहे. या उपक्रमास तालुका व्यवस्थापन कक्षाचे निलेश पवार सर तसेच प्रभाग समन्वयक माधवी वनारसे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे. सीआरपी सारिका निकम, लक्ष्मी कदम,कृषी सखी सीमा चव्हाण यांनी सदर स्टॉल्सचे नियोजन केले आहे. यावेळी ग्राम संघाचे पदाधिकारी तसेच समूहातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.




