माजी सरपंच चंद्रकांत थोरात यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

माजी सरपंच चंद्रकांत थोरात यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
रघुनाथ थोरात
कळंत्रेवाडी,ता.कराड येथील सिद्धेश किराणा स्टोअर्सचे मालक,माजी सरपंच चंद्रकांत थोरात यांचा ४४वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. चंद्रकांत थोरात यांनी पाच वर्षे गावचे सरपंचपद भूषवले होते. या पाच वर्षांच्या कार्यकाळात अनेक लोकोपयोगी विकासात्मक निर्णय घेऊन गावचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न केला. परिसरातील संयमी चेहरा म्हणून चंद्रकांत थोरात यांना ओळखले जाते. यावेळी माजी सरपंच नंदकुमार थोरात यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन चंद्रकांत थोरात यांचा सत्कार करण्यात आला.गावातील ग्रामस्थांनी त्यांना भावी आयुष्यासाठी आरोग्यदायी शुभेच्छा दिल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाचे ज्येष्ठ कार्यकर्ते, माजी खासदार श्रीनिवास पाटील यांचे निकटवर्तीय,माजी सरपंच गोपाळराव येळवे उर्फ बापू,माजी सरपंच नंदकुमार थोरात उर्फ आबा, माजी उपसरपंच सुनील थोरात उर्फ काका, माजी पोलीस पाटील भिमराव थोरात उर्फ आप्पा,रणजित थोरात,धनाजी थोरात,राजेंद्र थोरात,माजी सैनिक प्रदीप थोरात,स्वप्निल देशमुख,अमित चव्हाण, अविनाश थोरात,शशिकांत जाधव,संकेत जगताप आदि उपस्थित होते.




